Dainik Maval News : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची घटना नुकतीच सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील राजकोट येथे घडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मागील दोन दिवसांपासून या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले असून महायुती सरकारच्या कार्यकाळात घडलेल्या या घटनेचा महाविकासआघाडीकडून राज्यभर आंदोलन, मोर्चे, निवेदन यातून निषेध केला जात आहे. गुरुवारी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. ( Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Maval Taluka NCP Statement to Tehsildar )
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे ही घटना संतापजनक तितकीच वेदनादायी आहे. राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला. हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला संताप आणणारे आहे. केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुचनेनुसार मावळचे तहसीलदार यांना गुरूवारी पक्षाकडून निवेदन देण्यात आले, अशी माहिती तालुकाध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे यांनी दिली.
अधिक वाचा –
– सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संतोष भेगडे यांची पोलिसांत धाव, तक्रार अर्जात अनेकांची नावे । Talegaon Dabhade
– ‘त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
– कान्हे शाळेत बाल गोविंदांनी फोडली दहीहंडी, राधा – कृष्ण यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष