व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे काम सुरु झालेच असे समजा ; नितीन गडकरींचा आमदार शेळकेंना शब्द

तळेगाव-चाकण रस्त्याबाबत आमदार सुनिल शेळके यांनी घेतली गडकरींची भेट

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 2, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Regarding Talegaon Chakan road MLA Sunil Shelke met Nitin Gadkari

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झालेच असे समजून निश्चिंत रहा असे सुतोवाच केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मावळचे आमदार सुनिल शेळके आणि महामार्ग कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चेदरम्यान रविवारी (ता.०१) नागपूर येथे दिले. (  मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अपघात,वाहतूक कोंडीसह गेली अनेक वर्षे रखडलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्यासह तळेगाव- चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमीर प्रभावळकर, सदस्य संजय चव्हाण, गणेश बोरुडे आदींच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी रविवारी (ता.०१) सकाळी भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर चर्चा केली.

कृती समितीकडून दिलेल्या निवेदनात प्रस्तावित एनएच ५४८-डी तळेगाव-चाकण-शिक्रापूर सहा पदरी उन्नत महामार्गाच्या (एलिव्हेटेड कॉरिडॉर) भूसंपादनाची सनद प्रसिद्ध करुन निविदा प्रक्रिया पूर्ण करावी.सदर महामार्ग एमएसआईडीसीकडे (महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ) वर्ग करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच प्रस्तावित उन्नत महामार्गाचे काम पुर्ण होण्यास लागणारा मोठा कालावधी पाहता,तोपर्यंत तात्पुरती उपयोजना आणि विशेष बाब म्हणून किमान अस्तित्वातील ५४ किलोमीटर रस्त्याचे अतिक्रमण काढून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे दुभाजकावर चौपदरीकरण करण्यात यावे असे निवेदन कृती समितीकडून गडकरी यांना देण्यात आले.त्यावर गडकरी यांनी सकारात्मकता दाखवत “तुमच्या रस्त्याचे काम झाले म्हणून समजा” असे गडकरी यांनी शिष्टमंडळाला सांगत सदर रस्त्याच्या कामाला प्राधान्याने गती देणार असल्याचे सांगितले.

याबरोबरच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूककोंडी होत असलेल्या मुख्य ठिकाणी उड्डाणपूल उभारावेत तसेच सेवारस्त्यांच्या प्रलंबित कामांबाबत आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत याची दखल घेत लवकरच ठोस निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आमदार शेळके यांना सांगितले. तळेगाव-चाकण महामार्गासंदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ठोस आश्वासन दिल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना नक्कीच गती मिळणार आहे.

अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! कार्ला – मळवली दरम्यानचा नवा पूल लहान वाहनांसाठी खुला, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा । Karla News
– अजितदादांच्या निर्देशानुसार लोणावळा शहरात ऑनलाइन वाहतूकसेवा बंद झाली पाहिजे – आमदार सुनील शेळके
– वडगाव नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी संपावर ; सामान्यांची कामे रखडणार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

पवन मावळ विभागातील 800 विद्यार्थीनींना ‘गुड टच – बड टॅच’चे धडे ; रोटरी क्लब आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांचा उपक्रम

Next Post

भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव, पवन मावळातील शेतकरी चिंतेत, कृषि विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
outbreak of Karpa disease on paddy

भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव, पवन मावळातील शेतकरी चिंतेत, कृषि विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.