व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभेसाठी भाजपाने कसली कंबर, भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून गावभेटी सुरू

मावळ विधानसभेची निवडणूक रंजक पातळीवर : भारतीय जनता पार्टीकडून गाव भेट दौऱ्यांचे आयोजन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 4, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
BJP preparation for Maval Vidhan Sabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभेतील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस मधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची लक्षणे आहेत. कारण, ‘आमचं ठरलंय’ आणि ‘कमळ हाच आमचा उमेदवार’ अशी घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मावळ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मागील पंचवार्षिक निवडणूक सोडली तर, मावळ विधानसभेत सदासर्वकाळ भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व राहिले आहे. सध्याचे विद्यमान आमदार भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेले आणि आमदार झाले. त्यामुळे भाजपाची प्रचंड ताकत असलेल्या या मतदारसंघात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष गणेश भेगडे, निवडणूक प्रमुख भाजपा मावळ विधानसभा रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

प्रत्येक गावात जात भाजप कार्यकर्ते जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधत भाजप विचारांच्या नागरिकांना साद घालत आहे. गावभेट दौऱ्यात सुरुवातीला चांदखेड ,कुसगाव ,आढले खु, दारुंब्रे,आढले बु सांगवडे , डोणे, गहुंजे ,गोडूंब्रे ,पुसाने ,पाचाणे , ओवळे , सांळुब्रे ,दिवड , शिरगाव या गावांना भेटी देऊन , ग्रामस्थांशी आणि मतदारांशी संवाद साधण्यात आला.

याप्रसंगी ज्ञानेश्वर दळवी, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, नितीन मराठे, नितीन घोटकुले, अभिमन्यू शिंदे, रघुवीर शेलार, बाळासाहेब घोटकुले, जितेंद्र बोत्रे, रामदास गाडे, संभाजी म्हाळसकर, दत्तात्रेय माळी, गणेश धानिवले, किरण राक्षे, माऊली आडकर, माऊली ठाकर, बाबुलाल गराडे, रामभाऊ गोपाळे, प्रनेश नेवाळे यांच्यासह भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते , आजी-माजी सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , विविध कार्यकारी विकास सोसायटी चेअरमन, संचालक व नागरिक , बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( BJP preparation for Maval Vidhan Sabha elections Village visit tour started )

अधिक वाचा –
– स्पर्धात्मक युगाचे आव्हान पेलणारा विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज – आमदार सुनिल शेळके
– राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा ; केंद्र शासनाकडून कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी
– ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार ; ३१ जुलैनंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे । Lonavala News

Next Post

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत ‘मावळरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Distribution of Maval Ratna Award

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत 'मावळरत्न' पुरस्कार वितरण सोहळा संपन्न । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.