Dainik Maval News : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सप्टेंबर महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे ३ व ४ सप्टेंबर, मंचर येथे ९ व १० सप्टेंबर, जुन्नर येथे १८ व १९ सप्टेंबर, वडगाव मावळ येथे २४ व २५ सप्टेंबर तर लोणावळा येथे २६ व २७ सप्टेंबर या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
अर्ज कसा करावा –
शिकाऊ अनुज्ञप्ती काढून ३० दिवस झाल्यानंतर पक्क्या अनुज्ञप्तीच्या वाहन चालविण्याच्या चाचणी परिक्षेकरिता अर्ज करु शकतो.
आवश्यक कागदपत्रे –
– नमुना ४ (Form ४)
– शिकाऊ अनुज्ञप्ती
– नजीकच्या कालावधीत काढलेले तीन फोटो.
– वयाचा आणि पत्त्याचा केंद्रिय मोटार वाहन नियम ४ नुसार पुरावा.
– परिवहन संवर्गातील वाहनांकरिता अर्ज केल्यास मोटार ट्रेनिंग स्कूलचे नमुना ५ मधील प्रमाण्पत्र.
– शुल्क्
– ज्या वाहनांवर चाचणी द्यावयाची त्या वाहनांची सर्व वैध कागदपत्रे.
चाचणी परिक्षा –
वाहनचालक चाचणी यशस्वीरित्या पार केल्यानंतर चालकास परवाना दिला जाईल. जर चालक वाहनचालक चाचणी पास करू शकला नाही तर तो सात दिवसांच्या कालावधी नंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो. ( Pimpri Chinchwad RTO Monthly Visit Time Table September 2024 Read in Details )
अधिक वाचा –
– नाणे मावळातील गोवित्री, वळवंती येथील आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप । Maval News
– शिरे येथील रस्त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । Maval News
– मोठी बातमी ! इंदोरीच्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना मिळणार 68 कोटींचा अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road News