व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्यास आंदर मावळ विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; कार्यकर्त्यांचा एकच सूर ‘आता माघार नाही…’

गाव भेट दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी आंदर मावळ भागातील गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 14, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
Maval BJP village visit

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने गाव भेट दौरा सुरू आहे. गाव भेट दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी आंदर मावळ भागातील गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी गावा गावात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने आलेल्या पदाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काहीही झाले तरी , माघार घ्यायची नाही .मावळ विधानसभा लढवायची असा चंगच जणू , भारतीय जनता पार्टीने बांधला आहे. त्यादृष्टीने भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री बाळा भेगडे व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे , भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे हे भाजपचे तीनही प्रमुख नेते गाव भेट दौऱ्यात सहभागी असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

यामुळे येणाऱ्या काळात “आपल मावळ आपलं कमळ” “आता माघार नाही” “आमचं ठरलंय” या भूमिकेवर कार्यकर्ते अग्रेसर असून येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मावळ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा केला जाईल तो निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करतील अशी भूमिका गावागावातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या गावभेट दौऱ्यानिमित्त नेत्यांच्या कानावर घातल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे विद्यमान आमदारांच्या गोटात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तसेच गाव भेट दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या मगिणीला प्रतिसाद देताना , “गावातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला बूथ जिंकण्यासाठी आजपासून जोमाने कामाला लागावे” अशा सूचना देखील नेत्यांनी या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. या गावभेट दौऱ्यात , सावळा , निळशी , खांडी , कुसूर , बेंदेवाडी , डाहुली , कांब्रे , बोरवली , कुसवली , वहाणगाव , नागथली , शिंदेवाडी , वडेश्वर , माऊ , फळणे , टाकवे (बु.) या गावांना भेटी दिल्या.

याप्रसंगी दत्तात्रय गुंड, निवृत्ती शेटे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, बाळासाहेब घोटकूले, नितीन मराठे, रोहिदास असवले, अभिमन्यू शिंदे, गणेश कल्हाटकर , अरुण कुटे , संपत कदम, सुभाष देशमुख, विश्वनाथ जाधव, रवि आंद्रे, अभिजीत नाटक, उमेश पिंगळे, रामदास आलम, सुरेश आलम, किरण जगताप, प्रणेश नेवाळे, बाळासाहेब शिंदे, संभाजी देशमुख यांच्यासह भाजपा चे सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! संपूर्ण मावळवासियांना प्रतिक्षा असलेल्या कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच । Maval News
– पवन मावळ विभागात भातशेतीवर करपा, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव ; शास्त्रज्ञांनी घेतला आढावा । Maval News
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून सप्टेंबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे


Previous Post

सार्थक वायकर याच्या अपघाती मृत्यूनंतर नवलाख उंबरे ग्रामस्थांचा तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनवर मोर्चा । Maval News

Next Post

माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी समीर गाडे, उपाध्यपदी गणेश साबळे बिनविरोध । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Nutan Maharashtra Secondary Teachers and Servants

माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी समीर गाडे, उपाध्यपदी गणेश साबळे बिनविरोध । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.