Dainik Maval News : इंद्रायणी नदीमध्ये उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला एका युवकाचे प्राणाची बाजी लावून वाचविले आहे. युवराज शंकर शिंदे (रा. कामशेत) असे सदर युवकाचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
एका मनोरुग्ण तरुणीने इंद्रायणीत उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला होता. ती मुलगी इंद्रायणीत बुडू लागली होती. तेव्हा युवराज शिंदे या तरुणाने हिंमत दाखवत नदीत उडी मारून बुडणाऱ्या मुलीला जीवदान दिले. स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलीचा जीव वाचविणारा युवराज शिंदे खराखुरा देवदूत ठरला आहे.
इंद्रायणी नदी घाटावर गणपती विसर्जनाची गडबड असताना हा प्रकार घडला. थोडावेळ नदी परिसरात थांबल्यानंतर सदर तरुणीने नदीमध्ये उडी मारली. ती बुडत असल्याचे पाहताच लोकांनी आरडाओरड सुरु केली. मात्र कुणीही तिला वाचविण्यासाठी समोर आले नाही. मात्र तिथे उभा असलेल्या युवराजने कसलाही विचार न करता थेट नदीत उडी घेतली.
तो पोहत त्या मुलीपर्यंत पोहोचला आणि त्याने तिला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान इतरांनी कामशेत पोलीस ठाण्यात माहिती दिली. तोवर पोलीस देखील तत्काळ तेथे पोहोचले. युवकाच्या प्रयत्नांमुळे या तरुणीचा जीव वाचला. सदर तरुणीला पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले असून युवराज शिंदे या युवकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
अधिक वाचा –
– माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी समीर गाडे, उपाध्यपदी गणेश साबळे बिनविरोध । Maval News
– मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्यास आंदर मावळ विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; कार्यकर्त्यांचा एकच सूर ‘आता माघार नाही…’
– सार्थक वायकर याच्या अपघाती मृत्यूनंतर नवलाख उंबरे ग्रामस्थांचा तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनवर मोर्चा । Maval News