व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘रात्री 11 वाजता मी भाजपात होतो आणि सकाळी 11 वाजता..’, आमदार शेळकेंनी सांगितला 2019च्या तिकीटाचा घटनाक्रम

सुनिल शेळके हे स्वतः आणि त्यांचे कुटुंब भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंतांपैकी एक होते. त्यांच्या चार पिढ्या या भाजपातूनच राजकारणात पुढे आल्याचे स्वतः सुनिल शेळके यांनी सांगितले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 22, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Sunil-Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ मतदारसंघात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनिल शेळके यांनी एकीकडे दुसऱ्या टर्मची तयारी केलेली दिसते. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात महायुतीतील अनेक मातब्बर नेते मंडळी उभी ठाकली आहे. यादरम्यान शुक्रवारी (दि. 20) आमदार सुनिल शेळके यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यात आमदार शेळकेंनी अनेक गोष्टींचा खुलासा आणि काही गौप्यस्फोट केले आहे. यावेळी त्यांनी 2019 च्या निवडणूकीत आपल्याला तिकीट कसे मिळाले, याबद्दलचा घटनाक्रमही सांगितला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भाजपाचे निष्ठावंत शेळके कुटुंब –
सुनिल शेळके हे स्वतः आणि त्यांचे कुटुंब भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंतांपैकी एक होते. त्यांच्या चार पिढ्या या भाजपातूनच राजकारणात पुढे आल्याचे स्वतः सुनिल शेळके यांनी सांगितले. तसेच 2019 च्या निवडणूकीसाठी आपण अनेक वर्षे तयारी करत होतो, त्यातून तिकीटासाठी प्रयत्न सुरू होते, परंतु अखेरच्या क्षणी काही घडामोडी घडल्या. त्यामुळे भाजपाची साथ सुटली मात्र, आजही भाजपाच्या वरीष्ठांबद्दल आदर आहे, तसेच भाजपाचे कार्यकर्तेही सोबत असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.

एका रात्रीतून परिस्थिती बदलली –
2019 साली जाहीर झालेल्या तिकीटाचा घटनाक्रम आमदार सुनिल शेळके यांनी स्वतः उलगडून सांगितले. ते म्हणाले, ‘ 2 ऑक्टोबरच्या सायंकाळी स्व. दिगंबर दादा यांच्या सोबत भाजपाच्या शिष्टमंडळाला पुण्यात भेटायला गेलो होतो. तिथे त्यांना शिष्टमंडळाने सांगितले की यावेळी भाजपाची उमेदवारी बदला आणि आम्हाला संधी द्या. पण तिथेच बाळाभाऊंची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर रात्री 11 वाजता आपण, दिगंबर दादा, रवी भेगडे तळेगावात परत आलो. त्यानंतर पुढे काय करायचा याचा विचार सुरु होता. परंतु दुसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी सकाळीच अजित पवार यांनी माझ्या पक्षप्रवेशापूर्वीच राष्ट्रवादीकडून माझी उमेदवारी जाहीर केली.’ ( MLA Sunil Shelke 2019 Maval Assembly Election NCP Candidate Defection from BJP )

मी एकदा संधी द्या असं म्हटलो होतो, पण…
‘आमदार सुनिल शेळके भाजपातून राष्ट्रवादीत आले आणि एकदा आमदार होण्याची संधी मागितली म्हणून त्यांना उमेदवारी दिली, पण ते आता दुसऱ्यांदा आमदारकीसाठी तिकीट मागतायेत’ असा आरोप होत असल्याचा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी आमदार सुनिल शेळके यांना प्रकट मुलाखतीदरम्यान विचारला. त्यावर बोलताना आमदार सुनिल शेळके यांनी हे सर्व आरोप फेटाळले. तसेच, आपण एकदा संधी द्या असे पक्षाकडे कधीही बोललो नव्हतो आणि चारभिंतीआडही बोललो नव्हतो, असे ठामपणे सांगितले. ‘मी एकदा संधी द्या असं बोललो होतो, पण ते मावळच्या चाळीत ते पंचेचाळीस हजार जनतेपुढे बोललो होतो. मावळच्या मायबाप जनतेच्या सेवेसाठी आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकवेळ संधी द्या असं मावळच्या जनतेला बोललो होतो, कुठेही चारभिंतीआड किंवा पक्षाकडे तसं बोललो नव्हतो, असे आमदार सुनिल शेळके यांनी ठोकपणे सांगत सर्व चर्चांवर पुर्णविराम दिला.

अधिक वाचा –
– तळेगाव येथील नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सभासदांना लाभांश जाहीर । Talegaon Dabhade
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद, आमदार शेळकेंसह सर्वपक्षीयांचा सहभाग, मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं रजेवर । Lonavala Nagar Parishad
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke


dainik maval jahirat

Previous Post

संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन, पुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार

Next Post

‘पवार साहेबांच्या उमेदवाराला छुपा पाठींबा देण्याचा डाव…’ आमदार सुनिल शेळकेंचा गंभीर आरोप, मावळचे राजकारण तापले

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval MLA Sunil Shelke

'पवार साहेबांच्या उमेदवाराला छुपा पाठींबा देण्याचा डाव...' आमदार सुनिल शेळकेंचा गंभीर आरोप, मावळचे राजकारण तापले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.