व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुसळधार पावसाचा इशारा.. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी ; मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल

भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 26, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
heavy rain School holidays

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याच्या दृष्टिने २६ सप्टेंबर रोजी तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट व पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आल्याचे आदेश पुणे शहर वाहतूक पोलीस उप आयुक्त कार्यालयाच्यावतीन जारी करण्यात आले आहेत.

पुणे शहरातील दांडेकर पूल ते निलायम ब्रीज (सिंहगड मार्गावर), सावरकर पुतळा ते निलायम ब्रीज, न्यू इंग्लिश स्कूल टिळक मार्ग ते विसावा मारुती, सणस पुतळा चौक ते पूरम चौक, स. प. महाविद्यालय प्रवेशद्वार, नाथ पै चौक ते अलका चौक, अलका चौक ते भिडे जंक्शन व व्हीव्हीआयपी पार्किंग हे ड्रॉप पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत.

शहरातील भिडे पूल नदी पात्र (पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून), निलायम टॉकीज, पाटील प्लाझा, विमलाबाई गरवारे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, कटारिया हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल रमनबाग, मिनर्व्हा पार्किंग मंडई, हरजीवन हॉस्पीटल सावरकर चौक, हमालवाडा पार्किंग व पीएमपीएल मैदान पूरम चौक या ठिकाणच्या जागा पार्किंगसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. समारंभाला येणाऱ्या बसेससाठी डी. पी. रोड कोथरूड व शिवनेरी मार्ग, मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

खंडोजीबाबा चौक-टिळक चौक- सेनादत्त पोलीस चौकी- उजवीकडे वळण घेवून म्हात्रे पूल डावीकडे डी.पी. रोड, सावरकर चौकामधून येणाऱ्या बसेससाठी दांडेकर पुलावरून सरळ राजाराम पूल- उजवीकडे वळण घेवून डी. पी. रोड, सिंहगड मार्गावरून येणाऱ्या बसेस दांडेकर पूल-सावरकर पुतळा-मित्रमंडळ चौक- व्होल्गा चौक-सातारा रोड मार्केट यार्ड जक्शन वरून शिवनेरी रोड असे बसेस पार्किंग मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

Novel NIBR Ads

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी ड्रॉप पॉईंटच्या ठिकाणी उतरावे व त्यांची वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत, असे आवाहनही पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– राज्यव्यापी काम बंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी मावळ तालुका कोतवाल संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन । Maval News
– धक्कादायक ! पैशांच्या उधारीवरून झालेल्या वादातून तरुणाचा खून, तळेगाव एमआयडीसी हद्दीतील घटना । Talegaon Crime
– शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण, जांभवडे परिसरातील घटना । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

खोपोलीतील झेनिथ धबधबा येथे वर्षा विहारासाठी गेलेल्या तरुणीचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू । Khopoli News

Next Post

चांदखेड ग्रामपंचायतीची 80 हजारांची केबल चोरीला, गुन्हा दाखल । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

चांदखेड ग्रामपंचायतीची 80 हजारांची केबल चोरीला, गुन्हा दाखल । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.