शिवसेना ( Shiv Sena ) पक्षाचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांचे आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन ( Death Anniversary ) झाले होते. त्यांच्या निधनानंतर मुंबईत ( Mumbai ) बाळासाहेबांचे अखेरचे दर्शन घ्यायला न भूतो न भविष्यती अशी सामान्य माणसांची गर्दी जमली होती. ‘एक व्यंगचित्रकार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील कधीही न शमणारे वादळ’ होईपर्यंतचा बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास ( Balasaheb Thackeray Life Journey ) अनेक राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांमधून आपण तो समजून घेऊयात… ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बाळासाहेब ठाकरे यांच्या 86 वर्षांच्या आयुष्यातील काही महत्वाचे टप्पे
1926 : बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील केशव सिताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे समाजसुधारक होते.
1955 : बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची एक व्यंगचित्रकार म्हणून सुरुवात केली. इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे.
1960 : बाळासाहेब आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिक हे राजकीय व्यंगचित्रण करणारे मासिक सुरू केले.
19 जून 1966 : “प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या मराठी भाषकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाची स्थापना केली.”
1984 : शिवसेनेने हिंदूत्व या मुद्द्यावर भाजपासोबत युती केली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी शिवसेनेने भाजपाच्या सहाय्याने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली.
1989 : बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राची स्थापना केली
1992 : बाबरी मशिदीच्या पाडावाचे बाळासाहेबांनी समर्थन केले.
1995 : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार आले आणि शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले.
1996 : बाळासाहेबांचे सुपूत्र बिंदूमाधव ठाकरे यांचे 20 एप्रिल 1996 रोजी मुंबई-नाशिक हायवेवर अपघाती निधन झाले.
1999 : निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्षांसाठी मतदान करण्यावर बंदी घातली.
2004 : उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
2006 : राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्यांनी 9 मार्च 2006 साली स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.
2009 : बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
2012 : तब्येत खालावल्याने बाळासाहेबांना मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. 15 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. ( Mumbai Shiv Sena Party Founder Shivsena Chief Hindu Hridayasamrat Balasaheb Thackeray Life Journey )
अधिक वाचा –
– जनरल मोटर्सच्या कामगारांचे आंदोलन : महिलांनी काळ्या साड्या नेसून दिल्या मंत्री सुरेश खाडेंना भाऊबीजेच्या शुभेच्छा
– अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला! पवन मावळात बनणार पर्यटनाचा नवा ‘राजमार्ग’, आमदार शेळकेंकडून भूमिपूजन
– भाजपाचे ‘एक दिवा वंचितांसाठी’ अभियान; अहिरवडे येथील आदिवासी वस्तीवर फराळ वाटप करुन दिवाळी साजरी