Dainik Maval News : महागाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रभागा निवृत्ती तिकोणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटीचे मावळते अध्यक्ष हनुमंत शिंदे यांनी आपला ठरविलेला कार्यकाल पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी तिकोणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी संचालक ज्ञानेश्वर कंधारे, लहु भालेसईन, गोविंद सावंत, नामदेव होजगे, अशोक सोनार, ज्ञानेश्वर ठाकर, ललिता बोडके, सखारम कंधारे, बबन सुतार, चंदा पवार उपस्थित होते. तर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ॲड खंडू तिकोणे, गुलाबराव म्हाळसकर, सरपंच संतोष घारे, बाळासाहेब जाधव रामदास घारे, रामदास घरदाळे, विलास पडवळ, दुंदा पडवळ, तानाजी पडवळ, दशरथ भालेसईन, विजय तिकोणे, बजरंग घारे यांनी प्रयत्न केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘शिवदुर्ग मित्र’चे संस्थापक अध्यक्ष सुनिल गायकवाड यांना पितृशोक
– कान्हे येथील महाआरोग्य शिबिराचा शनिवारी शेवटचा दिवस, आतापर्यंत 40 हजाराहून अधिक मावळवासियांनी घेतला लाभ
– पावसाने मोडला रेकॉर्ड : लोणावळ्यात यंदा 5822 मिमी पाऊस, गेल्या 24 तासात तब्बल 155 मीमी पाऊस । Lonavala Rain