व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘गांजा’ वाहतूक प्रकरणी तरुणाला रंगेहात अटक, कान्हे उपजिल्हा रुग्णालयासमोर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई । Vadgaon Maval

विक्रीच्या उद्देशाने जवळ गांजा बाळगून असलेल्या युवकाला वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.28 सप्टेंबर) रोजी कान्हे फाटा येथे करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 29, 2024
in लोकल, शहर
Vadgaon-Maval-Police-Station

File Photo


Dainik Maval News : विक्रीच्या उद्देशाने जवळ गांजा बाळगून असलेल्या युवकाला वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.28 सप्टेंबर) रोजी सकाळी 11.40 वाजताच्या सुमारास उपजिल्हा रूग्णालय, कान्हे फाटा येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार सचिन भगवान काळे (वय 42 वर्षे) यांनी वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी, सतीष ऊर्फ संतोष ऊर्फ माया सुरेश डोळस (वय 26 वर्षे, रा. जांभुळ, ता. मावळ) याच्या विरोधात गुं. औ. आणि म. परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (ब), II (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.28) रोजी उपजिल्हा रूग्णालय व ट्रामा केअर युनिट कान्हे फाटा येथील गेट नंबर 1 च्या समोर रस्त्यावर सतीष ऊर्फ संतोष ऊर्फ माया सुरेश डोळस (वय 26 वर्षे, रा. अनंत सृष्टी सोसायटी, जांभुळ, ता. मावळ) हा त्याच्या ताब्यातील ॲक्टीव्हा स्कुटरच्या (क्र. MH 14 LF 8933) डिक्कीमध्ये 985 ग्रॅम वजनाचा ‘गांजा’ हा अंमली विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगून वाहतुक करताना मिळून आला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात कलम 8 (क), 20 (ब) 11 (अ) एन डी पी एस कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपीकडून एकूण 20,000 रूपये किंमतीच्या हिरव्या रंगाच्या प्लॅस्टिकचे पिशवीला सेलोटेपचे वेस्टन असलेला 985 ग्रॅम इतका ‘गांजा’ हा अंमली पदार्थ, 20,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन, 70,000 रुपये किमतीची दुचाकी (क्र. एम एच 14 एल एफ 8933) असा एकूण 1 लाख 10 हजार रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई एस. ए. जावळे हे करीत आहेत.

ही कारवाई संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, हेड कॉन्स्टेबल सचिन काळे, उमाजी मुंढे, सचिन देशमुख, पोलीस शिपाई विठ्ठल पतुरे, अधिकराव झेले यांनी केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरसेनापती श्रीमंत खंडेराव दाभाडे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन । Talegaon Dabhade
– महागाव सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रभागा तिकोणे बिनविरोध । Pavana Nagar
– रानडुक्कराची शिकार करून मांस वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक, वडगाव मावळ वनविभागाची कारवाई । Maval News


Previous Post

लोणावळ्यात दोन किलो गांजा जप्त, महिलेसह 2 जणांवर गुन्हा दाखल । Lonavala Crime

Next Post

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची कान्हे शाळेला सदिच्छा भेट । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kanhe School Maval

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची कान्हे शाळेला सदिच्छा भेट । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.