व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत खोपोलीतील कारमेल स्कूलचे वर्चस्व । Khopoli News

ही स्पर्धा १४,१७ व १९ वर्ष मुले व मुली अश्या गटात खेळवल्या गेल्या आणि कारमेल स्कूल खोपोलीच्या चारही संघांनी अंतिम फेरी गाठून विजय संपादन केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 29, 2024
in महाराष्ट्र
Karmel School of Khopoli

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : क्रीडा व युवक सेवासंचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय – रायगड अलिबाग आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा २०२४-२५ चे भव्य आयोजन कारमेल कॉन्व्हेन्ट स्कूल खोपोली येथे शासनाच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ३० संघांनी विविध वयो गटात सहभागी होऊन आपल्या सांघिक खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले.

स्पर्धेच्या उदघाटन समारंभा समयी खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे, उपमुख्याध्यापिका सिस्टर आयविन, सत्येंद्र यादव,क्रीडा शिक्षिका जयश्री नेमाने. क्रीडा शिक्षिक समीर शिंदे,धनश्री गौडा,अमित थिटे,प्रणय गायकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक शीतल राऊत हे स्वतः विद्यपीठ तथा राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू असून त्यांनी विविध स्तरावर या खेळात नैपुण्य प्राप्त केले आहे. त्यांनी आपल्या मनोगतात या खेळविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन करत खेळातील बारकावे समजावून सांगताना सराव आणि सातत्य हेच यशाचे गमक आहे. खेळाडूने प्रत्यक्ष मैदानावर जाऊन किमान दोन तास खेळायला हवे मोबाईल पासून दूर राहत खेळ आणि अभ्यास याचा योग्य सामन्वय साधला पाहिजे या बाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले.

ही स्पर्धा १४,१७ व १९ वर्ष मुले व मुली अश्या गटात खेळवल्या गेल्या आणि कारमेल स्कूल खोपोलीच्या चारही संघांनी अंतिम फेरी गाठून विजय संपादन केला. विजेत्या संघाची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, सर्व विजेत्यांचे व प्रशिक्षकांचे कारमेलच्या लोकल मॅनेजर सिस्टर मरिना यांनी कौतुक केले.

स्पर्धेचा अंतिम निकाल
१४ वर्ष मुली
विजेता-कारमेल स्कूल,खोपोली
उपविजेता- दिल्ली पब्लिक स्कूल,पनवेल
१४ वर्ष मुले
विजेता-कारमेल स्कूल खोपोली
उपविजेता- एल.के.एम स्कूल उरण

१७ वर्ष मुली
विजेता-कारमेल स्कूल खोपोली
उपविजेता- एल.केएम. स्कूल उरण
१७ वर्ष मुले
विजेता- दिल्ली पब्लिक स्कूल,पनवेल
उपविजेता- कारमेल स्कूल खोपोली.

१९ वर्ष मुली
विजेता-दिल्ली पब्लिक ज्युनिअर कॉलेज
उपविजेता- जनता ज्युनियर कॉलेज खोपोली
१९ वर्ष मुले
विजेता- एल.के.एम ज्युनिअर कॉलेज उरण
उपविजेता- व्ही.डी.एम ज्युनिअर कॉलेज खोपोली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! ‘मुख्यमंत्री योजनादूत’ बनण्यासाठी अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, असा करा अर्ज । Mukhyamantri Yojana Doot
– ‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, ‘इथे’ करा अर्ज । Pune News
– मावळच्या लोकप्रतिनिधीचा केंद्रात सन्मान ! खासदार बारणे यांची केंद्रीय ऊर्जा विभागाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड । MP Shrirang Barne


Previous Post

एकविरादेवी नवरात्रोत्सव दरम्यान रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे ; लोणावळा पोलिसांच्या सुचना

Next Post

‘पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी दोन एकर नाही तर चार एकर जमीन मिळावी’ । Pavana Dam News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana-Dam-Maval

'पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी दोन एकर नाही तर चार एकर जमीन मिळावी' । Pavana Dam News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.