Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या चार नद्यांवर प्रदूषण नियंत्रण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत प्रदूषित झालेली नदी स्वच्छ करणे आणि नदी प्रदूषण होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरण (नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन डिक्टोरेट एनआरसीडी) यांनी 1 हजार 967 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
‘पीएमआरडीए’ हद्दीतून मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या नद्या जातात. वाढते नागरिकरण, औद्योगिकीकरण यामुळे या नद्यांच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता ‘पीएमआरडीए’ प्रशासनाने या नद्या स्वच्छ करून प्रदूषणमुक्त करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी 1967 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 40 टक्के निधी राज्य सरकार, तर 60 टक्के निधी ‘एनआरसीडी’ देणार आहे. सध्या मुळा-मुठा नद्यांचे स्वच्छतेचे काम सुरू आहे. तर इतर दोन्ही नद्यांच्या ‘डीपीआर’चे काम सुरू आहे.
पवना नदीचा ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात
इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचा केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालया अंतर्गत ‘एनआरसीडी’ कडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रक्लपाचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर मुळा- मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचे काम सुरू आहे.
नदीचे नाव, लांबी आणि अपेक्षित खर्च
इंद्रायणी – 105 किमी, 793 कोटी
पवना – 35 किमी, 197 कोटी
मुळा, मुठा – 107 किमी 977 कोटी
निधीतून होणारी कामे
1. मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) उभारणे
2. नद्यांचे प्रदूषित पाणी एकत्रित संकलित करण्यासाठी मल वाहिन्या टाकणे
3. जलपर्णी निर्मूलन
4. घन कचरा व्यवस्थापन
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत खोपोलीतील कारमेल स्कूलचे वर्चस्व । Khopoli News
– एकविरादेवी नवरात्रोत्सव दरम्यान रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे ; लोणावळा पोलिसांच्या सुचना
– कुंभार समाजोन्नती मंडळाच्या मावळ तालुका युवक अध्यक्षपदी जयंत कुंभार । Maval News