व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची होणारी लुटमार थांबवावी, खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी करण्याची मागणी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीट दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जाते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 16, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
In wake of Diwali festival private travel operators increase ticket prices to great extent

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ऐन सणासुदीच्या तोंडावर खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकीत भाडेवाढ करून प्रवाशांची होणारी लुटमार थांबविण्याबाबत वाहतूक विभागाने योग्य कारवाही करावी, याबाबत राष्ट्रवादी काँगेस पार्टी वाहतूक विभागाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे उपस्थित होते. तसेच यावेळी वाहतूक विभाग अध्यक्ष विनोद वरखडे, शहर उपाध्यक्ष स्वप्निल चव्हाण, शहरकार्याध्यक्ष अकबर शेख, सामाजिक कार्यकर्ते संजिवकुमार डोणापुरगे, भरत मोहोड, आप्पा दौंडे, संजीव रत्नजी तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर निवेदनात, सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत, त्यातच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीट दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जाते. त्यामुळे गोर गरिब प्रवाशांना नाहक जास्त दर द्यावा लागत आहे, म्हणून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे येथे मोठे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे, तसेच शिक्षणाचे माहेरघर असल्या कारणाने कामगार तसेच विद्यार्थी पिंपरी-चिंचवड व पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे दिवाळी सणासाठी हे विद्यार्थी व कामगार तसेच नागरिक सणासाठी गावी जातात.

खास करून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र ,मराठवाडा या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. तसेच आत्ताच रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले असून एसटी महामंडळाकडे पण खूप मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवासी नागरिकांना ट्रॅव्हल्स हाच पर्याय शिल्लक असतो, मात्र ट्रॅव्हल्स चालकांकडून या या काळात मोठ्या प्रमाणात तिकीट दर वाढवले जातात. तसेच काही ठिकाणी तिकीट दरामध्ये दुप्पट तिप्पट वाढ केली जाते. या कारणामुळे प्रवाशांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे.

नागरिकांना या त्रासापासून सुटका होऊन त्यांची होणारी लुटमार थांबावी, अशी अपेक्षा वाहतुक विभागाने व्यक्त केली आहे. दिवाळी सण दरम्यान प्रवासी खाजगी बसची वाहतूक पथकामार्फत तपासणी करावी. तिकीट बुकिंग काउंटरवर देखील जाऊन चेकिंग करावी व गैरप्रकार आढळल्यास कारवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं : 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू । Maharashtra Vidhansabha Election
– मोठी बातमी ! दुपारी 12 वाजता होणार राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी, ‘हे’ 7 जण बनणार आमदार
– तळेगावमधील कुंभारवाडा परिसराचे नामकरण श्री संत गोरोबाकाका नगर असे करण्याची मागणी । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ येथे आजपासून श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा । Vadgaon Maval

Next Post

द्रुतगती मार्गावर बर्निंग कारचा थरार ! कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी निघाले होते भाविक । Mumbai Pune Expressway

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Burning Car on Mumbai Pune Expressway

द्रुतगती मार्गावर बर्निंग कारचा थरार ! कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी निघाले होते भाविक । Mumbai Pune Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.