Dainik Maval News : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा, पवनानगर, टाकवे, इंदुरी, सोमाटणे फाटा येथील बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या काळात खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागरिकांनी केलेल्या खरेदीमुळे तालुक्यातील बाजारपेठांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे.
दीपावली सणाच्या अगोदर पासूनच बाजारपेठांमधील किराणा दुकानदार, कपड्याचे दुकानदार, इलेक्ट्रॉनिक दुकानदार याशिवाय सजावटीची आणि इलेक्ट्रीक दुकानदार, तसेच सराफी दुकानदार यांचे व्यवसाय या काळात प्रचंड तेजीत आले होते. त्यामुळे सर्वच ठिकाणच्या बाजारपेठांत व्यापारी क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. तर दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची देखील प्रचंड ही होत होती.
दिवाळी सणापूर्वी दिवाळीचे पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या किराणा दुकानांमध्ये व मोठ्या मॉलमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. याशिवाय दीपावलीच्या मुहूर्ताच्या काळात सराफी दुकान, मिठाईचे दुकान यामध्ये देखील खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
दिवाळी पूर्वीच काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि खासगी कंपन्यांमधील कामगारांना बोनसची रक्कम हातात आली होती. त्यामुळे यावर्षी जवळपास सर्वच नागरिकांनी सढळ हाताने खर्च करीत दिवाळीचा सण जोरदार आणि उत्साहाने साजरा केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– “सुनीलअण्णांनी पाच वर्षे तालुक्याला भरभरून दिलंय, आता त्यांना भरभरून मतदान करूयात”
– कागदपत्रे दाखवून पंधरा दिवसांच्या आत बेवारस वाहने घेवून जाण्याच्या तळेगाव पोलिसांच्या सूचना । Talegaon Dabhade
– वडगावमधील ‘त्या’ तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून आमदार सुनिल शेळके यांचे आरोप फेटाळले ; म्हणाले, आम्ही…