व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या सुनीलअण्णांच्या पाठीशी कष्टकरी समाज उभा राहणार – बाबा कांबळे

कष्टकरी पंचायतीच्या वतीने व टपरी, हातगाडी, पथारी पंचायतीच्या वतीने मावळचे आमदार सुनील शेळके यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 8, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
On behalf of Baba Kamble Tapri Hatgadi Pathari Panchayats announced support to Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा व मावळ तालुक्यामधील कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या आमदार सुनील अण्णांच्या पाठीशी मावळ तालुक्यातील कष्टकरी समाज टपरी, पथारी, हातगाडी हा व्यवसाय करणारा सर्वसामान्य मतदार पूर्ण ताकतीने उभा राहणार असल्याचे कष्टकरी पंचायतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले. तसेच कष्टकरी पंचायतीच्या वतीने व टपरी, हातगाडी, पथारी पंचायतीच्या वतीने मावळचे आमदार सुनील शेळके यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला असून सर्व नागरिकांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना बहुमताने निवडून देण्यासाठी पुढील पंधरा दिवस काम करायचे असे आव्हान देखील त्यांनी लोणावळा येथे पत्रकार परिषदेत केले आहे.

यावेळी लोणावळा टपरी, पथारी, हातगाडी पंचायत चे अध्यक्ष वसंतराव काळोखे पाटील, कार्याध्यक्ष रमेश म्हाळस्कर, मावळ तालुका अध्यक्ष गणेश चव्हाण, नवनिर्वाचित सदस्य पथविक्रेता समिती अशोक कदम, आकाश परदेशी, निर्मला पांगारे, सुजाता म्हाळसकर, मुस्कान शेख, लक्ष्मण दाभाडे सरदार, ताजुद्दीन शेख, गणेश काळडोके, महादेव जगताप यांच्यासह टपरीधारक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाबा कांबळे म्हणाले, मागील अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही कष्टकरी समाजाचे नेतृत्व करत शासनाकडे आमच्या मागण्या मांडत होतो. मात्र आजपर्यंत आमच्या मागण्या कोणी पूर्ण करत नव्हते. महायुती सरकारने आमची दखल घेतली व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कष्टकरी समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. लोणावळा शहरामध्ये कष्टकरी टपरी, पथारी, हातगाडी या व्यवसायिकांना आमदार सुनील शेळके यांनी पाठबळ दिले. नुकतेच लोणावळा शहरामध्ये टपरी पथारी हातगाडी पंचायत यांची निवडणूक पार पडली त्यामध्ये देखील आमचे सर्व सदस्य निवडून आले आहेत. लोणावळा शहर हे महाराष्ट्रातील एकमेव शहर असे आहे की, ज्या ठिकाणी ओला उबेर ही बंद झाली आहे.

मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्यासारखे कणखर नेतृत्व या मावळ तालुक्याला लाभले. त्यामुळेच आज कष्टकरी समाजाला न्याय मिळत आहे. आमचा रिक्षा चालक, आमचा टॅक्सी चालक यांना न्याय देण्याची भूमिका स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याची भूमिका ही आमदार सुनील शेळके यांनी घेतली. त्याचमुळे आज या लोणावळा शहरांमधील व मावळ तालुक्यामधील संपूर्ण कष्टकरी समाज हा आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. आम्ही सर्वजण आमच्या सर्व संघटनांच्या वतीने आमदार सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा देत असून या पुढील काळामध्ये त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय राहून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रमेश म्हाळसकर म्हणाले ज्यावेळी लोणावळा नगर परिषदेच्या वतीने टपरीधारकांवर कारवाई करत त्यांचे संसार उध्वस्त करण्यात आले. त्यावेळी आमदार सुनील शेळके या कष्टकरी समाजाच्या मागे ठामपणे उभे राहिले. त्यांचे आर्थिक नुकसान आमदार सुनील शेळके यांनी भरून दिले, तसेच पुढील काळामध्ये या कष्टकरी समाजावर अन्याय होऊ नये याकरता त्यांच्या पाठीशी उभे राहिले. लोणावळा शहरांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे या समाजाला न्याय देण्याची भूमिका आमदार सुनील शेळके यांनी घेतली. आज आपण देखील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना आपले मत देऊन न्याय देण्याचे भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘महायुतीचा उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे राजकीय आत्महत्या’
– आमदार सुनिल शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल, रात्री दहानंतर प्रचार फेरी काढल्याने गुन्हा । Mla Sunil Shelke
– बापूसाहेब भेगडे यांच्या गाव भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद । Bapu Bhegade


Previous Post

मी फक्त भावकीसाठी नाही तर गावकीसाठी काम करतो – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke

Next Post

मावळ विधानसभेत बापूसाहेब भेगडे यांचा झंझावाती प्रचार ; विरोधी उमेदवारावर आरोपांच्या फैरी । Bapu Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
campaign tour of Bapusaheb Bhegde in Maval Assembly Constituency is going on

मावळ विधानसभेत बापूसाहेब भेगडे यांचा झंझावाती प्रचार ; विरोधी उमेदवारावर आरोपांच्या फैरी । Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.