व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार शेळकेंच्या विकासाचा पुराव्यानिशी पंचनामा करणार : भेगडे । Bapu Bhegade

मावळात सर्व पक्षांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा का दिला, याचे विरोधकांनी आत्माचिंतन करावे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 11, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Bapu Bhegde criticism of Sunil Shelke after bridge in Takve BK village not completed

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळातील एका गावातील रस्त्यासाठी 42 लाख रुपये खर्च केले. पण रस्ता, पूलही अस्तित्वात नाही. त्यामुळे पूल, रस्ता हरवला आहे, अशा तक्रारी पोलीस स्टेशनला द्याव्यात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही पुराव्यासह आमदार शेळके यांच्या विकासाचा पंचनामा करणार आहोत, असा इशारा भाजपाचे नेते गणेश भेगडे यांनी दिला.

मावळ विधानसभेतील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारार्थ आंदर मावळातील राजपुरी, बेलज, टाकवे, फळणे, माऊ, वडेश्वर नागाथली, वहाणगाव, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहुली, कुसुर, खांडी, निळशी, सावळा, माळेगाव खुर्द, तळपेवाडी आदी गावांमध्ये प्रचारदौरा झाला. मतदारांनी प्रत्येक गावात फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत स्वागत केले.

यावेळी या सर्व गावांतील ग्रामस्थांसह शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना गणेश भेगडे म्हणाले की, तालुक्यात कार्यकर्ते संकल्पना संपुष्टात आणली आहे. मलिदा गँगचे यांचे कार्यकर्ते असतील, तर यांचा अध्यक्ष कोण ? आमदार शेळकेंच्या भोवतीच पोलिसांचा गराडा असेल, तर ते नागरिकांना सुरक्षा काय देणार ? असा सवालही गणेश भेगडे यांनी केला.

गावगाडा चालवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. टाकवे गावातून कंपन्या बाहेर का गेल्या, दूध व्यवसाय येथून स्थलांतरित का झाले याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे का नाही ? कान्हे येथील पूल अद्याप का केला गेला नाही. हा पूल झाला असता तर इंडस्ट्री बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. इंडस्ट्रीज बाहेर गेल्यामुळे तरुणांना रोजगार देणे देखील कठीण बनले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात हा पूल होणं आवश्यक होतं. महिला सक्षमीकरण तरुणांच्या हाताला काम हेच आपले व्हिजन आहे. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळची संस्कृती बिघडत चालल्याने सर्व पक्ष एक झाले – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade
– पोलिसांनी जप्त केलेली रक्कम माझ्या व्यवसायाची, विरोधकांनी दबाव आणून कारवाई करण्यास भाग पाडले – सचिन मुऱ्हे
– मावळात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कार्यालयातून 36 लाखांची रोकड जप्त, सोमाटणे येथे मोठी कारवाई । Maval Crime 


Previous Post

जनतेकडून मला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांकडून ‘रडीचा डाव’ सुरु – सुनिल शेळके । MLA Sunil Shelke

Next Post

आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांकरिता रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण बांधील : बापूसाहेब भेगडे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha independent candidate Bapu Bhegde campaign tour in Andar Maval

आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांकरिता रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण बांधील : बापूसाहेब भेगडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.