व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांकरिता रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण बांधील : बापूसाहेब भेगडे

आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांना मोठी रोजगारनिर्मिती करण्यासाठी आपण बांधील असणार आहोत, असे आश्वासन बापूसाहेब भेगडे यांनी तरुणांना दिले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 11, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval Vidhan Sabha independent candidate Bapu Bhegde campaign tour in Andar Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शासनाच्या विविध योजना तुमच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचल्या नाहीत की मुद्दाम पोहोचवल्या नाहीत ? हा प्रश्नच आहे. विद्यमान आमदारांचे गेल्या पाच वर्षात जनतेच्या प्रश्नांकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने आंदर मावळमधील समस्या वाढतच चालल्या आहेत. आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांना मोठी रोजगारनिर्मिती करण्यासाठी आपण बांधील असणार आहोत, असे आश्वासन बापूसाहेब भेगडे यांनी तरुणांना दिले.

बापूसाहेब भेगडे यांनी शनिवारी आंदर मावळातील पिंपरी, माळेगाव बुद्रुक, कुणेवाडी, कुणे, अनसुटे (मानकुली) पारिठेवाडी, इंगळून, किवळे, कशाळ, भोयरे, कोंडीवडे, कल्हाट, पवळेवाडी, निगडे, आंबळे, कदमवाडी, शेटेवाडी, शिरे, मंगरूळ, गोळेवाडी आदी गावांना भेट देत प्रचारदौरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, शिवाजी आसवले, गणेश कल्हाटकर, शिवाजीराव पवार आदींसह ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी-माजी सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचार भेटीदरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. आपण समस्या सोडविण्यास बांधील असल्याचे आश्वासन देत बापूसाहेब भेगडे म्हणाले, की विद्यमान आमदार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देणार होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले ? पाच वर्षात शेतीला पाणी पुरवता आला नाही. जवळ धरण असतानाही शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. आपण प्रथम शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करू, असे सांगितले.

आपण माजी आमदार कृष्णराव भेगडे, मदन बाफना, नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यामुळे माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. त्यामुळेच आपण मावळची संस्कृती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असून, मावळला समृद्ध बनवणे हे आपले ध्येय आहे, असेही भेगडे म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळची संस्कृती बिघडत चालल्याने सर्व पक्ष एक झाले – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade
– पोलिसांनी जप्त केलेली रक्कम माझ्या व्यवसायाची, विरोधकांनी दबाव आणून कारवाई करण्यास भाग पाडले – सचिन मुऱ्हे
– मावळात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कार्यालयातून 36 लाखांची रोकड जप्त, सोमाटणे येथे मोठी कारवाई । Maval Crime 


Previous Post

आमदार शेळकेंच्या विकासाचा पुराव्यानिशी पंचनामा करणार : भेगडे । Bapu Bhegade

Next Post

महाविकासआघाडीचं ठरलं , भाजपाचे ‘ते’ नेते अडचणीत ! बापूसाहेबांसाठी मविआचे कार्यकर्ते सक्रीय, भाजपा कार्यकर्त्यांचा ‘यू टर्न’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha MVA support to Bapu Bhegade BJP workers Sunil will work for Sunil Shelke

महाविकासआघाडीचं ठरलं , भाजपाचे 'ते' नेते अडचणीत ! बापूसाहेबांसाठी मविआचे कार्यकर्ते सक्रीय, भाजपा कार्यकर्त्यांचा 'यू टर्न'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.