व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आव्हानांचा डोंगर पार करून सुनिल शेळके कसे विजयी झाले? वाचा शेळके यांच्या विजयाची 5 मुख्य कारणे । MLA Sunil Shelke

मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी लाखाचे मताधिक्य मिळवित आपला गड राखला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 26, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Legislative Assembly Constituency Election 2024 main reasons for MLA Sunil Shelke victory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी लाखाचे मताधिक्य मिळवित आपला गड राखला. सुनिल शेळके यांनी मोठे मताधिक्य मिळविले असले तरीही त्यांच्यासाठी ही लढाई तितकी सोपी नव्हती. एकीकडे मावळातील शेळके यांचे सगळे विरोधक ‘मावळ पॅटर्न’ या अनोख्या युतीतून एकत्र आले होते. त्यामुळे शेळकेंसमोर आव्हानांचा मोठा डोंगर उभा राहिला होता. मात्र योग्य नियोजन करीत शेळकेंनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करीत विक्रमी विजय मिळविला आहे. शेळकेंच्या विजयाची अनेक कारणे आहेत, त्यातही पाच प्रमुख कारणांची माहिती आपण घेणार आहोत.

1. सात ते आठ वर्षे सातत्याने जनतेच्या संपर्कात
आमदार सुनिल शेळके हे मागील सात ते आठ वर्षांपासून सातत्याने मदारसंघातील जनतेच्या संपर्कात राहिले आहेत. पहिल्यांदा आमदार होण्यापूर्वीच शेळकेंनी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून जनतेच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यानंतर आमदार झाल्यावरही सुनिल शेळके सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिले. तालुक्यासाठी 4 हजार कोटीचा विक्रमी निधी आणल्याने त्यांची प्रतिमा भरवश्याची बनली.

2. कोरोना काळात केलेली जनसेवा
सुनिल शेळके हे 2019 ला पहिल्यांदा आमदार झाले, पण काही महिन्यातच राज्यासह कोरोनाचे संकट आले. परंतु या कोरोना महामारीच्या काळातच मावळच्या जनतेला सुनिल शेळके यांच्यातील जनसेवकाचे रुप दिसले. कोरोनात शेळकेंनी आदर्शवत असे काम केल्याचे संपूर्ण तालुक्याने नव्हे तर राज्याने पाहिले. त्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात कायम आदरभाव राहिला.

3. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. सुनिल शेळके यांनाही ही योजना फायद्याची ठरली. परंतु या योजनेसोबतच तालुक्यातील महिलांसाठी सुनिल शेळके यांनी पाच वर्षांत विविध उपक्रम राबविले, त्यामुळे महिला वर्गाचा मोठा पाठींबा शेळके यांना मिळाला. निवडणुकीत देखील तालुक्यातील लाडक्या बहीणींनीच लाडक्या भावाला मोठी आघाडी दिली.

4. पाच वर्षांत प्रत्येक समाजघटकासाठी काम
आमदार झाल्यावर सुनिल शेळके यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले. विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला, आदिवासी, मागासवर्गीय, दिव्यांग अशा सर्वांसाठी सुनिल शेळके यांनी काहीना काही काम केले. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या योजनेला लाभार्थी राहिला. शासन आपल्या दारी याद्वारे अनेकांचे शासकीय दाखल्यांचे प्रश्व सुटले.

5. जनतेच्या जोरावर निवडणुकीत विजयी
सुनिल शेळके यांनी पाच वर्षांत जे काही काम केले, त्यामुळे ते थेट मतदारांशी जोडले गेले. यामुळे पुढारी सोबत असोत किंना नसो, शेळकेंनाी त्यामुळे फरक पडला नाही. आताही जेव्हा तालुक्यातील बहुतांश दिग्गज पुढारी शेळकेंच्या विरोधात गेले होते, तेव्हा फक्त जनतेसोबत असलेला जनसंपर्क आणि त्यांच्यावरील विश्वासावर शेळकेंनी निवडणूक लढविली आणि जिंकली सुद्धा.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day
– विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर : राज्यातील ‘हे’ 5 निकाल ठरले सर्वात धक्कादायक, अजूनही विश्वास बसेना
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल


dainik maval jahirat

Previous Post

सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

Next Post

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीचे वेध, शेतीची मशागत सुरु । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Farmers of Maval taluka have started sowing of rabi season

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीचे वेध, शेतीची मशागत सुरु । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.