व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day

संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 26, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Constitution-Day

File Photo


Dainik Maval News : भारतात दिनांक 26 नोव्हेंबर ( 26 November ) हा संविधान दिन ( Constitution Day ) म्हणून साजरा केला जातो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. जगभरातील सर्वच संविधानांचा तेव्हा बारकाईने अभ्यास केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसूदा समितीच्या सहाय्याने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता.

दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो मसूदा भारतीय संविधान सभेसमोर मांडण्यात आला आणि त्याच दिवशी तो स्विकारण्यात आला. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2015 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला ‘संविधान दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताचा गणराज्य दिन हा 26 जानेवारी असला तरीही देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. ( Constitution Day Know 9 Interesting Facts Of Indian Constitution )

भारतीय संविधानाची 9 खास वैशिष्ट्ये ;
1. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची सभेचे स्थायी अध्यक्ष होते.

2. संविधानाची मूळ प्रत कुणी लिहिली, असे विचारल्यावर अनेकजण बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात. पण खरेतर संविधानाची मूळ प्रत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात लिहिली गेली आहे.
3. संपूर्ण संविधान तयार होण्यासाठी साधारण 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला होता.

4. दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान पूर्ण झाले आणि भारतीय प्रजासत्ताकाची ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून देशात लागू झाली.
5. भारतीय संविधान हे लिखित स्वरुपातील तरतुदी असणारे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. भारतीय संविधानाच्या इंग्रजी प्रतीमध्ये 1,17,369 शब्द आहेत.

6. भारताचे संविधान हे 22 भाग, 448 कलमे, 22 याद्या आणि 12 अनुसूचीत विभागलेले आहे.
7. संविधानाची मूळ प्रत ही इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिली गेली होती. त्यामुळे संविधानावर स्वाक्षरी करणाऱ्या सदस्यांना दोन प्रतींवर स्वाक्षरी करावी लागली.

8. भारतीय संविधानाची हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मूळ प्रत संसदेतील ग्रंथालयात असणाऱ्या एका पेटीत आजही जपून ठेवण्यात आली आहे.

9. डॉ. भीमराव आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. भारतीय संविधान सभेने संविधान निर्मितीशी संबंधित विविध कार्ये हाताळण्यासाठी एकूण 13 समित्यांची स्थापना केली होती. त्यातील मुख्य मसूदा समितीचे अध्यक्ष हे डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.
( Constitution Day Know 9 Interesting Facts Of Indian Constitution )

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल
– अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result
– ‘आमदार’ होणार आता ‘नामदार’ ! सुनिल शेळके यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के? राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा


dainik maval jahirat

Previous Post

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर : राज्यातील ‘हे’ 5 निकाल ठरले सर्वात धक्कादायक, अजूनही विश्वास बसेना

Next Post

26/11 – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण… ती एक काळ रात्र होती, शेकडो मृत्यू अनेकजण जखमी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mumbai-Attack

26/11 - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण... ती एक काळ रात्र होती, शेकडो मृत्यू अनेकजण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.