Dainik Maval News : भारतीय इतिहासात 26 नोव्हेंबर ही तारीख अत्यंत महत्वाची आहे. त्यातही महाराष्ट्रातील जनता तर हा दिवस विसरणे कदापी शक्य नाही. आजच्याच दिवशी इतिहासात म्हणजेच 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला धक्का बसला होता. तर, आर्थिक राजधानीवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश चिंतेच्या दरीत कोसळला होता. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी, जाणून घेऊयात… ( 26 November 2008 Mumbai Terror Attacks Remembering Heroes Memories Of 26 11 Attack )
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण होत आहेत. याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबई शहराला हादरवून सोडले होते. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले होते, तर कित्येक लोकांनी आपले सर्वस्व गमावले होते. आज सोळा वर्षानंतरही या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत.
मुंबई पोलीस, एटीएस अधिकारी, एनएसजी कमांडो, मार्कोस, अग्निशमन जवानांनी प्राण पणाला लावत 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर, शहीद तुकाराम ओंबळे यांनी स्वत:चा जीव देऊन ‘अजमल आमीर कसाब’ या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडले. याच कसाबला कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आले.
26/11 चा हा दहशतवादी हल्ला हा भारतावरील सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक होता. 26 नोव्हेंबर, 2008 रोजी शस्त्रास्त्रांसह पाकिस्तानातील दहा दहशतवादी कराचीहून समुद्रामार्गे बोटीने मुंबईत घुसले होते. या अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, ताजमहल हॉटेल, ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन हाऊसवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी सुमारे 60 तास धुमाकूळ घातला आणि या हल्ला 167 पेक्षा जास्त निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. तर, 300 हून अधिक लोक जखमी झाले होती. मृतांमध्ये 28 परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या हल्ल्यानंतर भारताने सागरी सुरक्षा धोरणात अमुलाग्र बदल केला होता. ( 26 November 2008 Mumbai Terror Attacks Remembering Heroes Memories Of 26 11 Attack )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल
– अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result
– ‘आमदार’ होणार आता ‘नामदार’ ! सुनिल शेळके यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के? राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा