व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर : राज्यातील ‘हे’ 5 निकाल ठरले सर्वात धक्कादायक, अजूनही विश्वास बसेना

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. शनिवारी (दि.23) मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 26, 2024
in महाराष्ट्र
Maharashtra Vidhan Sabha Election Result Shocking defeat of Balasaheb Thorat Prithviraj Chavan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. शनिवारी (दि.23) मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. आणि अविश्वसनीय निकालांनी सर्वांनाच धक्का बसला. राज्यात विक्रमी बहुमत घेत महायुती पुन्हा सत्तेत आली आहे. तर प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीचा निवडणुकीत जोरदार पराभव झाला आहे. त्यातही अनेक मातब्बर नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाहुयात एक यादी…

बाळासाहेब थोरात –
यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते तथा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणारे बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. संगमनेरमधून थोरात पराभूत झाले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी आठवेळा निवडणूक लढवली होती आणि ते एकदाही हरले नव्हते. मात्र आता नवव्या वेळी त्यांचा पराभव झाला.

पृथ्वीराज चव्हाण –
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाही पराभवाचा दणका बसला आहे. भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत. महाविकासआघाडीची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु चव्हाण यांचाच दारुण पराभव झाला आहे.

यशोमती ठाकूर –
काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा तिवसा विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात भाजपाचे राजेश वानखडे विजयी झाले आहेत. खरं तर राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसला धक्यावर धक्के बसले आहेत.

धीरज देखमुख –
माजी मुख्यमंत्री, स्व. विलासराव देशमुख यांचे सुपूत्र धीरज देशमुख यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर ग्रामीणमधून धीरज देखमुख यांचा पराभव झाला आहे. धीरज देखमुख यांच्यासाठी अभिनेता रितेश देशमुख यांचा प्रचार केला होता. मात्र, तरीही धीरज देखमुख यांचा पराभव झाल्यामुळे मोठा धक्का बसला.

बच्चू कडू –
आमदार बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. बच्चू कडू यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार प्रविण तायडे विजयी झाले आहेत. बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान दिलं होतं.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल
– अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result
– ‘आमदार’ होणार आता ‘नामदार’ ! सुनिल शेळके यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के? राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा


dainik maval jahirat

Previous Post

शाब्बास रे पठ्ठ्या ! देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार सुनिल शेळकेंवर कौतुकाची थाप, म्हणाले…

Next Post

संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Constitution-Day

संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Successful follow-up by Bala Bhegade government takes positive step toward declaring Maval drought-affected taluka

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा यशस्वी पाठपुरावा; मावळ दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर होण्याच्या दिशेने शासनाचे सकारात्मक पाऊल

October 27, 2026
Ravindra Bhegade met with CM devendra fadanvis to request an early meeting regarding Pavana farmer

पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकर बैठक घेण्याबाबत रवींद्र भेगडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

October 27, 2026
Prize distribution ceremony for Late Suryakant Kaka Walunj Memorial Drawing Competition talegaon dabhade

सात हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव! कै. सूर्यकांत काका वाळुंज स्मृती चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

October 26, 2026
Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.