व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 23, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तीर्थक्षेत्र देहूगाव ते देहूरोडपर्यंतच्या संरक्षण विभागाच्या हद्दीतील रखडलेल्या पालखी मार्गाला मिळणार गती । Dehu News

तीर्थक्षेत्र देहूगाव ते देहूरोडपर्यंतचा साडेतीन किलोमीटर अंतराचा संरक्षण विभागाच्या हद्दीतील श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 14, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
mp shrirang barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तीर्थक्षेत्र देहूगाव ते देहूरोडपर्यंतचा साडेतीन किलोमीटर अंतराचा संरक्षण विभागाच्या हद्दीतील श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पायी चालताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी तत्काळ संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात घेऊन रखडलेल्या मार्गाचे काम सुरू करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्यावर याबाबत संरक्षण विभाग आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासोबत लवकरच एकत्रित बैठक घेण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यामुळे रखडलेल्या मार्गाला गती मिळेल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील पहिले साडेतीन किलोमीटर म्हणजे देहूगाव ते देहूरोड हे अंतर रुंदीकरण करणे फार महत्त्वाचे आहे. लष्कराच्या ताब्यात ही जमीन आहे, त्यामुळे येथे अडचणी आहेत. हा सुरुवातीचा टप्पा अतिशय कठीण आहे. तुकारामांची पालखी निघताना गाव लोटलेला असतो. यावेळेस या पालखी मार्गावरून बससेवा, वाहतूक आदी बंद ठेवावी लागते. त्याचा स्थानिक नागरिकांना खूप मोठा फटका बसतो. त्यामुळे देहूगाव ते देहूरोड हे अंतर रुंदीकरण करण्याची वारकऱ्यांची मागणी आहे.

याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत तारांकित प्रश्नाद्वारे आवाज उठविला. ते म्हणाले, देहूगाव ते देहूरोड या साडेतीन किलोमीटर अंतराचा पालखी मार्ग संरक्षण विभागाच्या हद्दीतून जातो. या जागेचा ताबा राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या जागेतील मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. यामुळे वारकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता पंढरपूर वारीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर होणारी वाहतूक आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय अत्यंत गरजेचा आहे. रस्त्याच्या देखभालीसाठी तसेच वारीच्या पवित्र सोहळ्याच्या सोईसाठी रखडलेला मार्गाचे रुंदीकरण करणे भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा मार्ग कधीपर्यंत पूर्ण होईल. संरक्षण विभागासोबत जागेसंदर्भात काय कारवाई केली जाईल असा प्रश्न खासदार बारणे यांनी केला.

त्यावर उत्तर देताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले, रखडलेल्या पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरात लवकर संरक्षण विभागासोबत बैठक घेतली जाईल. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशीही चर्चा केली जाईल. त्यात मार्ग काढून काम पूर्ण केले जाईल.

tata tiago ads may 2025

नितीन गडकरी यांचे अभिनंदन
देहूतून पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग जात आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. वारकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. पालखी मार्ग केल्याबद्द खासदार बारणे यांनी नितीन गडकरी यांचे लोकसभेत अभिनंदन केले.

देहूगाव ते देहूरोडपर्यंत पालखी मार्गाच्या रखडलेल्या रुंदीकरणाबाबत लवकरच संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेण्याची ग्वाही मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यामुळे जागेचा प्रश्न सुटून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, असा विश्वास आहे. – खासदार श्रीरंग बारणे

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पेट्रोल पंपासमोर पार्क केलेल्या पाच हायवा वाहनांचे स्टार्टर चोरले, आंबी येथील घटना । Maval Crime
– मावळमधील आदिवासी पाड्यांवरील महिलांनाही मिळणार प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ, असा करा अर्ज । Maval News
– जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेश याने पटकाविले विश्वविजेतेपद ; विश्वविजेत्या गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव


dainik maval ads may 2025

Previous Post

ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटप आणि आरोग्यविषयी मार्गदर्शन । Maval News

Next Post

इच्छुक सुशिक्षित बेरोजगार, कारागीर व महिला बचतगटाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM Employment Creation Program scheme

इच्छुक सुशिक्षित बेरोजगार, कारागीर व महिला बचतगटाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Resolution meeting of BJP Andar Maval Vadgaon Kamshet mandal division concluded

भाजपा आंदर मावळ, वडगाव-कामशेत मंडल विभागाची संकल्प सभा संपन्न । Maval BJP

June 23, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरण ४५ टक्के भरले ! लवकरच ओलांडणार पन्नाशी, धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर कायम । Pavana Dam Updates

June 23, 2025
maval-loksabha-ncp-sunil-shelke

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी महत्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता, विरोधकांचेही बैठकीकडे लक्ष

June 22, 2025
162 buildings in Talegaon Dabhade Municipal Council area are dangerous

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत १६२ इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

June 22, 2025
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

June 22, 2025
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.