व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावच्या रस्त्यांवरील अंधार होणार दूर… शहरातील मुख्य रस्त्यांवर सौर पथदिवे बसविण्यास सुरुवात । Vadgaon Maval

राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यामधील तफावत पाहता अपारंपारिक उर्जेचा वापर करणे योग्य होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 30, 2024
in लोकल, शहर
Installation of solar street lights started on main roads in Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत 2 कोटी 25 लक्ष निधीतून वडगाव नगरपंचायत हद्दीत सौर ऊर्जेवर चालणारे स्ट्रीट लाईट्चे एकूण 30 पथदिवे बसविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी दिली.

वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशवनगर येथील खापरे ओढा ते रेल्वे गेट, कातवी येथील मुख्य रस्ता तसेच खंडोबा मंदिर ते विशाल लाॅन्स या तीनही रस्त्यावर सौर पथदिवे बसविणे व नगरपंचायत प्रशासकीय इमारत सोलर ऑफ ग्रीड सिस्टीम बसविण्यासाठी दिनांक 17 मार्च व 22 मे 2023 रोजी या कामांचे अंदाजपत्रक तयार करून सर्व विषयांना सभेत मान्यता देण्यात आली होती. मागील महिन्यात तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष निधी मंजूर झाला. त्यानंतर आता प्रथमतः शहरामधील खापरे ओढा परिसरातून सौर पथदिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यामधील तफावत पाहता अपारंपारिक उर्जेचा वापर करणे योग्य होणार आहे. राज्यातील ग्रामीण भागात सध्याचा विजेचा पुरवठा लक्षात घेता, ग्रामीण भागात पर्यावरण संतुलन प्रणित मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अपारंपारिक स्त्रोतातून निर्मित विजेचा पुरवठा व्हावा या उद्देशाने ग्रामीण भागातील रस्त्यांवर सौर पथ दिवे खांब उभारण्याची योजना सन 2010-2011 पासून महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण विभागाने कार्यान्वित केली आहे. ही योजना राज्य शासन, केंद्र शासन, नगरपंचायत‌ व इतर ग्रामपंचायतीच्या सहभागातून राबविण्यात येत आहे.

पर्यावरण संरक्षण, सुरक्षितता, कमी किंमत आणि विद्युत शॉकचा धोका नसल्यामुळे सौर पथदिवे अधिक सुरक्षितता सुनिश्चित करतात. भूमिगत स्फोट होण्याचा धोका नाही, कारण भूमिगत पाईप्स खोदण्याची आणि तारा टाकण्याची गरज नाही. सौरऊर्जा शोषून नंतर सौर ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर करून आणि नंतर प्रकाशाचा पुरवठा करून सौर ऊर्जा पथदिवे बनवले जातात. सौरऊर्जा कायमस्वरूपी वापरता येते, त्यामुळे विजेच्या वापराबाबत काळजी करण्याची गरज नाही व पर्यावरणाचे प्रदूषणही होणार नाही, असे मुख्याधिकारी निकम यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु 


dainik maval jahirat

Previous Post

सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब दाभाडे । Talegaon Dabhade

Next Post

लोणावळा ते खंडाळा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी ; नितीन गडकरी यांना निवेदन । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Demand for widening of National Highway between Lonavala and Khandala letter to Nitin Gadkari

लोणावळा ते खंडाळा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी ; नितीन गडकरी यांना निवेदन । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.