खोपोली शहरातील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये लायन्स क्लब ऑफ खोपोली च्या पुढाकाराने विज्ञान प्रदर्शनाचे औचित्य साधून विद्यार्थी आणि पालक वर्गासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात अपोलो हॉस्पिटल, ऑल फॉर आईज हॉस्पिटल, समर्पण ब्लड बँक इत्यादी आरोग्य संस्थांचा सहभाग होता. यावेळी डोळ्यांची तपासणी, मधुमेह तपासणी, हाडांचा ठिसूळपणा तपासणी, रक्तदान शिबिर, फुफुसाची तपासणी आणि इतर व्याधींची तपासणी करण्यात आली. ( Health Camp at Khopoli by Lions Club )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर शिबिरास लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा ला. शिल्पा मोदी आणि त्यांचे पदाधिकारी, कार्मेल कॉन्व्हेंट स्कुलच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल आणि शिक्षक वृंद, पालक वर्ग उपस्थित होता. शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावले.
अधिक वाचा –
– अबब..! मुंबई-बंगळुरु महामार्गावर मागील 6 महिन्यांत तब्बल 40 कोटींचा दंड वसूल
– मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, वाचा सविस्तर