व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांच्या जनसंवाद दौऱ्याला लोणावळा शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहरांमधून सुरू केलेल्या जनसंवाद दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 18, 2025
in लोकल, शहर
Spontaneous response of citizens of Lonavla city to public interaction tour of MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहरांमधून सुरू केलेल्या जनसंवाद दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. प्रभाग निहाय आमदार सुनील शेळके व त्यांचे कार्यकर्ते नागरिकांच्या घरापर्यंत जात त्यांच्या समस्या समजावून घेत त्यांची लेखी निवेदने प्राप्त करून घेत आहेत. त्याप्रमाणे तात्काळ लोणावळा नगरपरिषद प्रशासन, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कामाबाबतचे निर्देश दिले जात आहेत.

मावळ तालुक्यामध्ये आमदार सुनील शेळके यांनी जनसंवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात विधानसभेला सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या लोणावळा शहरापासून करण्यात आली आहे. वलवण गावातून या दौऱ्याला सुरुवात झाली. महादेव मंदिरासमोर नागरिकांच्या समस्यांची लेखी निवेदने स्वीकारल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी वलवन गाव, समता नगर, वलवन तलाव या परिसराची पाहणी करत त्या त्या ठिकाणचे अंतर्गत रस्ते, गटारी, नाले, व्यायाम शाळा व नागरिकांच्या इतर समस्यांबाबत प्रशासनाला निर्देश देत विहित कालावधीमध्ये ही कामे पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच या कामांसाठी लागणारा निधी हा देखील देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

नांगरगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नागरिकांचा सत्कार व समस्यांची लेखी निवेदने आमदार सुनील शेळके यांनी स्वीकारली. नांगरगाव भागामधून आमदार सुनील शेळके यांना मोठे मताधिक्य मिळाल्याने या भागातील विकास कामांना लागणारा जो काही निधी असेल तो देण्याची आश्वासन त्यांनी दिले. तरुणांसाठी या ठिकाणी व्यायामशाळा बांधण्याबाबत तात्काळ नगर परिषदेने कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.

तसेच नांगरगाव भागातील अंतर्गत गटारी, रस्ते भांगरवाडी नांगरगाव रेल्वे उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपुलाच्या खालून येणारा मोठा नाला हा नदीपर्यंत आरसीसी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. रेल्वे उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करण्याबाबतच्या सूचना ठेकेदार व लोणावळा नगरपरिषद प्रशासन यांना दिल्या आहेत. या कामांमध्ये येणारे अडथळे पुढील महिनाभरामध्ये सोडवण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येत्या आठ दिवसात बैठक लावत कामाला गती देणार असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

जिजामाता नगर, कालेकर मळा, राव कॉलनी या भागातील नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी तात्काळ निर्देश दिले आहेत. डेनकर कॉलनी या ठिकाणी एका बांधकाम व्यवसायकाने नैसर्गिक नाक्यावर स्लॅब टाकत नाला अरुंद केला आहे. त्यामुळे या भागात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्याबाबत लोणावळा नगरपरिषदेत तात्काळ कारवाई करत नाला पूर्वत खुला करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आमदार सुनील शेळके यांच्या या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा भरभरून असा प्रतिसाद लाभत आहे. निवडणूक काळामध्ये ज्याप्रमाणे नागरिक आमदार सुनील शेळके यांची वाट पाहत तासंतास थांबत होते. त्याच पद्धतीने या जनसंवाद यात्रेमध्ये आमदार सुनील शेळके यांना भेटून आपल्या समस्या मांडण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत आहेत. आमदार सुनील शेळके देखील प्रत्येक नागरिकाची समस्या समजावून त्याची लेखी निवेदने घेत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने काम करत लोणावळा शहरांमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News 


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यातील कल्पना चावला स्पेस अकादमीच्या फिरत्या प्रयोगशाळेचे आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Lonavala News

Next Post

वडगाव मावळ येथे विजयदिन सोहळा उत्साहात । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
sardar mahadji shinde Victory Day celebration at Vadgaon Maval in excitement

वडगाव मावळ येथे विजयदिन सोहळा उत्साहात । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.