Dainik Maval News : पोलिसांकडे आमच्या विरुद्ध तक्रार का दिली, म्हणून जाब विचारत वडिलांना आणि त्यांच्या मुलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कान्हे येथील आंबेवाडीत बुधवारी रात्री घडला. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडतीस वर्षीय महिला फिर्यादीने याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विजय राजू गुजराती (वय ३२), विक्रम राजू गुजराती (वय ३३), संतोष राजू गुजराती (वय ३५), रवि राजू गुजराती (वय २२), विजय चंदू साथळे (वय ३२), विनोद चंदू साथळे (वय ३२), गोविंद नारायण साथळे (वय २७) आणि विकास नारायण साथळे (वय २२) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १५ जानेवारी रोजी रात्री ११:३० वाजता आंबेवाडी येथील रोडवर ही घटना घडली. फिर्यादी आपल्या पती व मुलासोबत रस्त्याने चालत असताना चार मोटारसायकलवरून आठ आरोपी त्यांच्या जवळ आले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी ‘तुम्ही आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार का दिली?’ असा सवाल करत त्यांच्यावर राग व्यक्त केला.
त्यानंतर फिर्यादीचे पती (जे डोळ्याने अपंग आहेत) आणि मुलगा यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याशिवाय फिर्यादीच्या मुलाने भांडणाचा व्हिडीओ काढल्यामुळे आरोपी विजय राजू गुजराती यांनी फिर्यादीचा मोबाईल काढून घेतला. तसेच फिर्यादींच्या पतींचा चष्मा विक्रम राजू गुजराती यांनी हिसकावून घेतला. वडगाव मावळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News