व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे येथे ॲग्री स्टॅक योजनेसाठी नोंदणी शिबिर, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; काय आहे ॲग्री स्टॅक योजना? वाचा सविस्तर

मावळ तालुक्यातील कान्हे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ॲग्री स्टॅक शेतकरी ओळखपत्र उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 29, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
What is Agri STACK Yojana Learn More in Marathi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कान्हे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ॲग्री स्टॅक शेतकरी ओळखपत्र उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतीचा संलग्न माहिती संच तयार केला जाणार आहे. शेतकऱ्यांची माहिती आणि आकडेवारी करण्यास या योजनेमुळे मदत होणार आहे.

काय आहे ॲग्री स्टॅक योजना?
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. डिजिटल पद्धतीचा शेतीमध्ये वापर व्हावा यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. केंद्र सरकार डिजिटल पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत अनेक योजना पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते. तशीच आज एक योजना सरकारने आणली आहे तिचे नाव आहे ॲग्री स्टॅक योजना.

ॲग्री स्टॅक योजनेचा फायदा –
Agri Stack yojana या योजनेमुळे पात्र असलेल्या शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. ॲग्री स्टॅक योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे सरकार राबवत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. Agri Stack yojana ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीएम किसान योजना आणि पीक विमा सह सर्व सहकारी योजनांचा अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने लाभ मिळणार आहे. यासाठी देशभरात शेतकरी नोंदणी कार्यक्रमाला गती देण्यात येत आहे.

ॲग्री स्टॅक योजनेसाठी अशी करा नोंदणी –
Agri Stack yojana 2024 In marathi या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी शेतकरी विभागाच्या https://upfr.agristack.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकता किंवा तुमच्या जवळच्या नोंदणी शिबिरात किंवा ग्रामपंचायतीकडे भेट देऊनही तुम्ही ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत ची नोंदणी करून या योजनेचा लाभ मिळवू शकता.

कान्हे येथील शिबिराला शेतकऱ्यांची उपस्थिती –
कान्हे येथील नोंदणी शिबिरात नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, मंडल अधिकारी सुरेश जगताप, ग्राममहसूल अधिकारी प्रतिमा वाघोले, ग्राममहसूल अधिकारी चेतन राठोड, ग्राममहसूल अधिकारी राम बाचेवाड, ग्राममहसूल अधिकारी स्वप्नाली आहेर, ग्रामपंचायतअधिकारी संतोष शिंदे, अधिकारी व ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व योजनेचा लाभ व माहिती सांगितली. सीएससी केंद्र तसेच तलाठी कार्यालय येथे फार्मर आयडी ॲग्री स्टॅक तयार करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांने आपले आधार कार्ड व मोबाईल सोबत ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे ओटीपी आधारे नोंदणी करता येईल अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड


dainik maval jahirat

Previous Post

वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन

Next Post

संत तुकाराम साखर कारखान्यात 71 दिवसात तब्बल 2 लाख 37 हजार 565 मॅट्रिक टन उसाचे गाळप । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sugarcane

संत तुकाराम साखर कारखान्यात 71 दिवसात तब्बल 2 लाख 37 हजार 565 मॅट्रिक टन उसाचे गाळप । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.