Dainik Maval News : उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे झालेल्या ३८व्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत वडगाव मावळच्या सारिका शिनगारे व शुभम तोडकर या दोन खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करीत पदक पटकाविले आहे. दोघांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत मावळ तालुक्याचे नाव देशभर गाजविले आहे.
स्पर्धेत शुभम तानाजी तोडकर याने ६१ किलो वजन गटात उत्कृष्ट खेळ करत कांस्य पदक पटकावले, तर सारिका प्रभाकर शिनगारे हिने ४९ किलो वजन गटात दमदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले.
हे दोन्ही खेळाडू महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब, वडगाव येथे प्रशिक्षक ॲड. रवींद्र यादव, विक्रमसिंह देशमुख आणि अनिकेत नवघणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. त्यांच्या या शानदार यशाबद्दल त्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link