Dainik Maval News : ग्रामविकास विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यातील 1 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील एकूण 108 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरीता एकूण आरक्षण निश्चित करण्यात आले आहेत.
या आरक्षण सोडतीद्वारे ग्रामपंचायतनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता बहुउद्देशिय सभागृह, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे सोडत काढण्यात येणार आहे.
यादिवशी इच्छूक पदाधिकारी, नागरिकांनी हजर राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा