Dainik Maval News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ तालुक्यातील पदाधिकारी – कार्यकर्ते यांची तालुकास्तरीय आढावा बैठक वडगाव मावळ येथे शुक्रवारी (दि.21) पार पडली.
शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, शिवसेना पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, माजी उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर, महिला आघाडी जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, तालुका सल्लागार मारूती खोले आदी मान्यवरांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषदा – नगरपंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आढावा बैठकीमध्ये मार्गदर्शन व नियोजन करण्यात आले. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तालुक्यात मोठे यश प्राप्त करण्यासाठी पक्ष संघटना बळकटीकरण व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे यावर भर देण्यात यावा, अशा सूचना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
याप्रसंगी शांताराम भोते, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभुळकर, युवराज सुतार, तालुका समन्वयक रवीभाऊ गायकवाड, काळु हुलावळे, माजी नगरसेवक शिवदास पिल्ले, लोणावळा शहरप्रमुख परेश बडेकर, तळेगाव शहरप्रमुख शंकर भेगडे, देहुरोड शहरप्रमुख संदिप बालघरे, देहु शहरप्रमुख राजेंद्र मोरे, वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते, तळेगाव महिला आघाडी संगिताताई सोनवणे, आजी – माजी पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
मावळ तालुका शिवसेने पक्षाच्या वतीने व पुणे जिल्हाप्रमुख माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार व मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित पुणे जिल्हा संघटक पदी निवड झालेले बाळासाहेब फाटक, लोणावळा शहरप्रमुख पदी निवड झालेले परेश बडेकर, देहुरोड शहरप्रमुख संदीप बालघरे, देहु शहरप्रमुख राजेंद्र मोरे यांचा नियुक्ती बद्दल सन्मान करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा