Dainik Maval News : मुळशी तालुक्यातील माण येथे दुचाकीला पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये समोरच्या दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. २२) रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक दिवाकर दिघे (रा. हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचा मित्र शनिवारी मध्यरात्री दुचाकीवरून चहा पिण्यासाठी जात होते. माणरोड येथे आल्यानंतर पाठीमागून आलेल्या दुचाकीने महिलेच्या दुचाकीला धडक दिली.
अपघातात फिर्यादी महिला आणि त्यांचा मित्र गंभीर जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा