Dainik Maval News : तीन अल्पवयीन मुलांनी टपरी चालकावर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि.२०) रात्री आठ वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील बधलवाडी येथे घडली.
प्रथमेश गभाजी दहातोंडे (वय २२, रा. दत्त मंदिराजवळ, बधलवाडी पोनवलाख उंब्रेता, ता. मावळ, जि. पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी हे मावळ तालुक्यातील बधलवाडी येथील पानटपरीवर होते. त्यावेळी तिथे आलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी फिर्यादी प्रथमेश यांच्याकडे काहीएक विचारपुस न करता कोयत्याने मारहाण केली.
त्यामुळे फिर्यादी प्रथमेश त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर वार करून गंभीर जखमी करून तेथून निघून गेले आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा