Dainik Maval News : नव्याने प्रदर्शित झालेला आणि सध्या चर्चेत असलेला, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘छावा’ हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.
तहसीलदार विक्रम देशमुख यांना संघटनेकडून याबाबतचे निवेदन देण्यात आले. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकताच प्रदर्शित झालेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित छावा हा सिनेमा राज्य सरकारने टॅक्स फ्री करावा.
निवेदन देताना नरेंद्र मुऱ्हे, अमोल ढोरे, भाऊसाहेब ढोरे, गणेश भेगडे, तुषार वहिले, सुहास विनोदे व अन्य मराठा सेवक उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा