व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणी महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात ; राष्ट्राच्या उभारणीत महिलांचे योगदान मोठे – डॉ. संभाजी मलघे

जागतिक महिला दिन निमित्त महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 9, 2025
in लोकल, शहर
International Womens Day celebrated with enthusiasm at Indrayani College Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, महिला अंतराळवीर कल्पना चावला, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, नोबेल पुरस्कार प्राप्त मदर तेरेसा इत्यादी कर्तृत्ववान महिलांचे कार्य पाहता राष्ट्राच्या उभारणीत महिलांचे योगदान निश्चितच मोठे आहे, असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिन निमित्त महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सदस्या निरुपा कानिटकर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोते, उपप्राचार्य संदीप भोसले, गोरख काकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

  • आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य मलघे पुढे म्हणाले की, आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाटा खूप मोठा आहे. शिक्षण, राजकारण, समाजकारण, कला, संस्कृती, क्रिडा या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी उंच भरारी घेतली आहे. यावर्षी जागतिक खो-खो स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाची प्रियंका इंगळे हिच्या नेतृत्वाखाली भारताने खो खो स्पर्धेमध्ये बाजी मारून विश्वचषक जिंकला ही बाब महिलांच्या कर्तुत्वाला निश्चितच अधोरेखित करणारी अशी आहे. चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन महिला निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ लागल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात निरूपा कानेटकर यांनी सांगितले की, महिलांना आधुनिक युगात यशस्वी होताना स्वतः मधील स्त्रीपण आणि स्त्री सुलभ विचारांची जोपासना करणे आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला देखील दिला.

यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह मा. चंद्रकांत शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व महिला प्राध्यापिकांनी खेळांमध्ये भाग घेऊन मनमुराद आनंद लुटला.

खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमातील विजेते ;
प्रथम क्रमांक – प्रा. ऐश्वर्या शिंदे
द्वितीय क्रमांक – प्रा. पुजा तल्लूर
तृतीय क्रमांक – प्रा. प्राची भेगडे

विजयी स्पर्धकांना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. गाडेकर व प्रा विद्या भेगडे यांच्या हस्ते बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिप्ती कन्हेरीकर यांनी केले, तर आभार उपप्रचार्य संदीप भोसले यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री
– पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News
– चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News


Previous Post

पवनानगर येथे महिलांना अत्याधुनिक शेती व फुल शेतीविषयी मार्गदर्शन । Pavananagar

Next Post

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा ; मंगळवारी होणार जागतिक विक्रम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
The worlds largest turban of Jagadguru Sant Tukaram Maharaj

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा ; मंगळवारी होणार जागतिक विक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.