व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम’ जाहीर : 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार

सातबाऱ्यावरील मयताच्या नावांमुळे अनेकांना खरेदी-विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणासह अनेक अडचणी येतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 22, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर, शहर
Maharashtra Revenue Department Jiwant Satbara Campaign 7/12 names of pass will be reduced

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सातबाऱ्यावरील मयताच्या नावांमुळे अनेकांना खरेदी-विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणासह अनेक अडचणी येतात. सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत 1 एप्रिलपासून राज्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात 1 मार्चपासून सुरू असलेली जिवंत सातबारा मोहीम आता 1 एप्रिलपासून राज्यात सगळीकडे राबविली जाणार आहे. जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारा उताऱ्यावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद अभिलेखामध्ये नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोहिमेसंदर्भातील ठळक बाबी…

  • 1 ते 5 एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) त्यांच्या सजाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील.
  • 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे (मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख किंवा स्वयं घोषणापत्र, पोलिस पाटील किंवा सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासी पुरावा, अशी कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करावा लागणार.
  • ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी स्थानिक चौकशी करुन मंडळाधिकाऱ्यांमार्फत वारस ठराव ई- फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहेत. 21 एप्रिल ते 10 मे दरम्यान तलाठ्यांनी ई- फेरफार प्रणालीत वारस फेरफार तयार कराचा आहे.
  • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळाअधिकारी संबंधितांच्या वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार 7/12 उताऱ्यावर दुरुस्त करणार आहेत. यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

तहसीलदारांपासून विभागीय आयुक्तांपर्यंत जबाबदारी
महसूल विभागाच्या या आदेशानुसार तालुक्याचे संबंधित तहसीलदार समन्वय अधिकारी असतील. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कालबद्ध कार्यक्रम मुदतीत पूर्ण करण्याची कार्यवाही करायची आहे. जिल्हाधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तालुक्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन मोहीम राबविण्यामध्ये काही अडचणी आल्यास त्यांचे निराकरण जिल्हाधिकारी करणार आहेत. विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. साप्ताहिक अहवाल प्रत्येक सोमवारी ई-मेलवर सादर करावा लागणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी‌‌ मोर्चेबांधणी ; 22 मार्चला सर्व उमेदवारांची बैठक
– पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर आमदार सुनिल शेळकेंनी विधानसभेत उठवला आवाज ; मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या…
– मावळ मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक ; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची ग्वाही । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार मोफत वाळू देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

Next Post

वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.