Dainik Maval News : थुगाव येथील द्वारका किसन तरस तसेच कमल प्रसाद तरस यांनी भेकर जखमी अवस्थेत शेताच्या कडेला पळताना पाहिले. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून श्वानांपासून त्या भेकराचे प्राण वाचविले. त्याला जवळील गायीच्या गोठ्यात नेऊन त्याच्यावर प्रथम उपचार केले.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना याची माहिती दिली. गराडे यांनी याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांना कळवली. तसेच भेकर रेस्क्यूसाठी वन परिमंडळ अधिकारी दया डोमे, वनरक्षक आशा मुंडे, वनसेवक विशाल सुतार, तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य रमेश कुंभार घटनास्थळी पोहोचले. त्या भेकरास ताब्यात घेऊन प्रथम उपचारासाठी पुढे पुणे येथे भुगाव रेस्क्यू सेंटरला पाठविण्यात आले.
कुठेही वन्यजीव आढळल्यास टोल फ्री क्रमांक 1926 या नंबर वर फोन करावा किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचा 9822555004 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी किसन तरस, प्रकाश महादू सावंत, राहुल शांताराम पोटफोडे, दुर्गा किसन तरस यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
– ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News