व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 26, 2025
in महाराष्ट्र
new expressway route highway road way

File Image


Dainik Maval News : मराठवाड्यातील वाहनांना जर मुंबईला जायचे असेल तर यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव -लोणावळा हा मार्ग उपलब्ध आहे. मराठवाड्यातील जनता याच मार्गे मुंबईला जाते. पण, चाकण आणि शिरुर येथे असणाऱ्या एमआयडीसी अर्थातच औद्योगिक वसाहतीमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. पुणे-नगर महामार्गावर कायमच वाहनांची गर्दी पाहायला मिळते. मात्र आता ही वाहतूक कोंडी कायमची दूर होणार आहे आणि मुंबईला जाण्यासाठी एक नवा मार्ग विकसित होणार आहे.

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पाहता या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी या अनुषंगाने शिरूर-खेड-कर्जत असा नवा मार्ग विकसित केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

  • मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रस्ताव रेडी करून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सुद्धा पाठवला आहे. येत्या काही दिवसांनी हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या समोर मांडला जाईल आणि त्यानंतर या प्रस्तावाला हिरवा झेंडा मिळेल अशी आशा आहे.

कसा असणार नवा मार्ग?
प्राप्त माहितीनुसार शिरूर-कर्जत महामार्ग 135 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. शिरुर-पाबळ-राजगुरुनगर-शिरवली मार्गे पाईट-वांद्रे-कर्जत असा हा मार्ग राहणार असून याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आधीच तयार करण्यात आला आहे. हा रस्ता पुढे पनवेल-उरणला जोडला जाणार आहे. म्हणजेच या मार्गाने थेट मुंबईत पोहोचता येणार आहे. यासाठी जवळपास 12000 कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे.

हा प्रकल्प बीओटी म्हणजेच बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर ज्याला मराठीत बांधवापरा आणि हस्तांतरित करा असे म्हणतात, या तत्त्वावर विकसित केला जाणार असून या प्रकल्पाचा पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी या प्रकल्पामुळे दूर होईल असा विश्वास व्यक्त होतोय. हा प्रकल्प दीड वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून या प्रकल्पाला विविध विभागाच्या मान्यता देण्यात आल्या आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
– ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News


Previous Post

Lonavala Crime : लोणावळ्यात शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न ; आरोपी अटकेत

Next Post

मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mumbai Pune railway service Karjat Lonavla ghat Central Railway

मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.