राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी पोलिस भरतीची ( Maharashtra Police Recruitment 2022 ) तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांकरिता दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी आता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ( Date Extension For Filing Maharashtra Police Recruitment 2022 Application Announcement By Devendra Fadnavis )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘पोलिस भरतीच्या संदर्भात आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. तथापी अद्यापही काही ठिकाणांहून तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची तारिख आम्ही 15 दिवसांनी वाढवतो आहे. अर्जासाठी 15 दिवस अधिकचे आम्ही देत आहोत, त्यामुळे उर्वरीत तक्रारी आहेत त्याही दूर होतील’, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली.
राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ.
आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त.
अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 29, 2022
अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ( Date Extension For Filing Maharashtra Police Recruitment 2022 Application Announcement By Devendra Fadnavis )
अधिक वाचा –
– खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी महायुतीच्या कांचन भालेराव, राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरूंग
– कोंडिवडे येथून अपहरण झालेल्या मुलीची उत्तराखंडमधून सुटका, वाचा सुटकेचा थरारक अनुभव
– शिवसेनेचे नवीन संपर्कप्रमुख जाहीर, पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुखपदी ‘यांची’ नियुक्ती