व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, January 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे ; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश । Pune News

जिल्हाधिकारी कार्यालयात येथे क्रशर व खाणपट्टाधारकांच्या अडअडचणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 30, 2025
in शहर, ग्रामीण, पुणे
Crushers and mining

File Image


Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील तात्पुरते व कायमस्वरुपी क्रशर व खाणपट्टाधारकांनी सर्वप्रकारच्या परवानगी घेवूनच उत्खनन करावे, परवानगीकरीता लागणाऱ्या सर्व संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेवून परवानगीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात येथे क्रशर व खाणपट्टाधारकांच्या अडअडचणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुयोग जगताप, जिल्हा क्रशर खाणपट्टाधारक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप कंद यांच्यासह जिल्ह्यातील क्रशर खाणपट्टाधारक उपस्थित होते.

  • क्रशर आणि खाणपट्टाधारकांच्या समस्या जाणून घेवून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, क्रशर आणि खाणपट्टा परवानगीकरीता लागणाऱ्या पर्यावरण ना-हरकत प्रमाणापत्राकरीता क्रशर आणि खाणपट्टाधारकांना परवानगी देण्याबाबत पर्यावरण विभागाच्या सचिवांना विनंती करण्यात येईल. क्रशर खाणपट्टाधारकांनी आपल्या वाहनांवर जीपीएस लावून इलेक्ट्रानिक ट्रन्झिंट पासेस (ईटीपी) ठेवावे. आपआपल्या खाणपट्ट्याची भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी करुन घ्यावी. खाणपट्टयात केलेले उत्खनन आणि त्याकरीता भरलेल्या शुल्काचा ताळमेळ संबंधित तहसीलदाराकंडून तपासून करून घ्यावा.

जिल्ह्यात पारदर्शक पद्धतीने कामकाज करण्यावर प्रशासनाचा भर आहे, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. आपल्या परिसरात बेकायदेशीर कामकाज होत असल्यास प्रशासनास कळवावे, याबाबत तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही डूडी म्हणाले.

अपर जिल्हाधिकारी मापारी म्हणाले, तात्पुरते खाणपट्टाधारकांनी नियमाप्रमाणे ६ मीटर पेक्षा अधिक खोल खोदकाम करु नये, आवश्यक असलेल्या सर्वप्रकारच्या परवानग्या उपलब्ध करुन देण्याकरीता प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही मापारी म्हणाले. जगताप यांनी जिल्ह्यातील खाणपट्टयाबाबत माहिती दिली. कंद यांनी क्रशर, खाणपट्टाधारकांच्या अडीअडचणींबाबत सूचना केल्या. प्रशासनाच्यावतीने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा


Previous Post

आंबी येथील अवैध दारू भट्टीवर पोलिसांचा छापा, महिला आरोपीवर गुन्हा दाखल । Maval Crime

Next Post

मोठी बातमी : ‘पवना कृषक’ संस्थेची निवडणूक पुन्हा लांबली, निवडणूक कार्यक्रमात बदल । Pavan Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
election process of Pawana Krishak Seva Cooperative Society has started anew voting on April 5th

मोठी बातमी : 'पवना कृषक' संस्थेची निवडणूक पुन्हा लांबली, निवडणूक कार्यक्रमात बदल । Pavan Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Zilla Parishad Panchayat Samiti Elections 2026 7 candidates officially declared candidature in Maval

जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक 2026 : मावळ तालुक्यात आतापर्यंत ‘या’ 7 उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर

January 14, 2026
Read this information regarding Zilla Parishad Panchayat Samiti elections 2026

प्रत्येक मतदार दोन मते देणार, ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे, उमेदवारांना खर्चाची मर्यादा ; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत ‘ही’ माहिती नक्की वाचा

January 14, 2026
Errors in waste management in Vadgaon Nagar Panchayat

या कचऱ्याचा वाली कोण? वडगावच्या वेशीत तळेगावचा कचरा? वडगाव नगरपंचायतीच्या संबंधित यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

January 14, 2026
Lonavala-Municipal-Council

Lonavala : राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे देविदास कडू यांची बिनविरोध निवड

January 14, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषद l अडीच वर्षांनी नगराध्यक्षपदाची संधी मिळणार तत्पूर्वीच गणेश काकडे यांच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ

January 14, 2026
Jail-And-Court

अखेर नऊ वर्षांनी न्याय मिळालाच ! मावळमधील धामणे तिहेरी हत्याकांड प्रकरणातील दहा आरोपींना जन्मठेप, वडगाव कोर्टाचा निकाल

January 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.