Dainik Maval News : पवनानगर येथील पवना कृषक सहकारी संस्था ही परिसरातील 40 गावांची मुख्य सहकारी संस्था आहे. या संस्थेची 2025-2030 संचालक मंडळाची निवडणूक संपन्न झाली. यामध्ये भाजप व राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत ठरली होती.
परंतु मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची सुचना दिल्यानंतर शेवटच्या दोन दिवसात दोन्ही पक्षाचे प्रमुख नेत्यांनी बसून बिनविरोध करत भाजपला 7 तर 6 जागा ठरविण्यात आले होते. परंतु अचानक अपक्ष उमेदवाराने 20 मतदार आणून मतदान केले, त्यामुळे दोन्ही पॅनलच्या उमेदवार व नेत्यांची पळापळ झाली.
शेवटच्या अर्ध्या तासात मतदान केले, एकूण 232 मतदान झाले. परंतु अचानक गोंधळ उडाल्याने नक्की कोणत्या उमेदवारांना मतदान झाले आहे, हे समजायला मार्ग नव्हता. अखेर मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिले, अनेक वर्षे संस्थेवर भाजपाचे वर्चस्व आहे. काल झालेल्या निवडणुकीत भाजपाचे 9 तर राष्ट्रवादी 4 उमेदवार निवडून आले
निवडूण आलेले उमेदवार व त्यांना पडलेली मते :
सर्वसाधारण मतदार ८ जागा-
१)भाऊ सतू सावंत (१०९)
२)अनिल भागू तुपे (१०४)
३)धोंडू शिवराम कालेकर (१०२)
४)बबन अर्जुन दहिभाते (९७)
५)गणपत गोविंद घारे (८९)
६)अंकुश तातेराम पडवळ (८९)
७)किसन विष्णू घरदाळे (८६)
८)राम बारकू नढे (८५)
महिला प्रतिनिधी दोन जागा-
१)लक्ष्मीबाई किसन आडकर (११७)
२)सुशीला रामदास घरदाळे (१०८)
अनुसूचित जाती जमाती १ जागा-
१)अंकुश ज्ञानदेव सोनवणे (१२७)
इतर मागासवर्ग १ जागा
१)शेखर मारुती दळवी (११९)
भटक्या विमुक्त जाती – जमाती विशेष मागास वर्ग १ जागा
१)बाळू चिंधू आखाडे (११५)
१३ जागेसाठी ३२ उमेदवार रिंगणात होते
पवना कृषक निवडणुकीत तालुक्यातील बड्या नेत्यांनी विविध प्रकारचे डाव खेळत नेत्यांनी सर्व उमेदवार रिंगणात उतरवले. पंरतु महिनाभर चालू असलेल्या निवडणुकीत अनेक डावपेच काढून देखील निवडणूक बिनविरोध करण्यात सर्व नेत्यांना अपयश आले. परंतु निवडणुकीच्या मतदानाच्या आधी दोन दिवस निवडणूक बिनविरोध झाल्याचे नेते मंडळीनी जाहीर केले.
- परंतु मतदान दोन दिवसांवर आल्याने ही निवडणूक कोणत्याही प्रकारे बिनविरोध करता येणार नाही. मतदानाच्या दिवशी सकाळपासुन मतदान न करण्याचे ठरले. परंतु ऐनवेळी दुपारी साडेतीनच्या आसपास एक गट मतदान केंद्रावर दाखल झाला व मतदान करण्यासाठी गेले असता. मतदान केंद्रावर अचानक गर्दी झाल्याने यामुळे अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदार आले.
यावेळी सर्व उमेदवार व नेत्याची धावपळ झाल्याचे दिसून आले. यामुळे बिनविरोधची घोषणा फक्त घोषणाच राहिली, यामुळे दोन्ही गटातील नेत्यांना उमेदवायांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली धांदल
मतदान सुमारे सहा वाजता संपल्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात येणार असल्याचे निवडणूक प्रक्रियेमध्ये होते. परंतु एका गटाने दावा करत मतमोजणी आता नका करु उद्या करण्याची विनंती केली. पंरतु एका गटाने आताच मतमोजणी करण्याचा अग्रह धरल्याने दोन तासांच्या गोंधळानंतर मतमोजणी सुरुवात केली व रात्री साडे अकराच्या दरम्यान मतमोजणी पुर्ण झाल्याचे निवडणूक अधिकारी राकेश निखारे यांनी जाहीर केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number