Dainik Maval News : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा शहर हद्दीमध्ये एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. अपघातात 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.
छाया दिलीप हरणे (चांदीवाले) असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे, तर महिलेचे पती गितेश रमेश चांदीवाले (35 वर्ष) आणि त्यांचा मुलगा रिदान (8 वर्ष, सर्व रा. टिळक चौक, कल्याण) जखमी झाले आहेत.
- सोमवारी ( दि. 14 एप्रिल) दुपारी साडेतीन वाजता एक्सप्रेस वेवर किमी 53/230 येथे लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला. कल्याणहून कामशेतकडे जाणाऱ्या एका ह्युंदाई कारचा टायर फुटून ही कार हायवेवर लावण्यात आलेल्या लोखंडी क्रॅश बॅरियरला धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की सदरचा क्रॅश बॅरियर या कारच्या डाव्या बाजूने आत शिरला आणि मागील बाजूने बाहेर पडला. यात चालकाच्या बाजूला बसलेली महिला, छाया हरणे उर्फ चांदीवाले हिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना उपचारासाठी पवना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. तर आयआरबीने यंत्रणेच्या सहाय्याने गाडीत अडकलेल्या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. महामार्ग पोलीसचे सहा.पो.नि. स्वप्नील पाटील, पो.उप नि. इब्राहिम शेख, मुकुंद अयाचीत, पो.हवा. अमित जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval