Dainik Maval News : जम्मू काश्मीरमधील काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी (दि. २२) पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २४ पर्यटक जखमी झाली आहेत. पहेलगाम येथील या अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये काँग्रेस कमिटीकडून जाहीर निषेध करण्यात आला.
- दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी काँग्रेस पक्ष हा भारत सरकारच्या सोबत आहे, असे यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी सांगितले. भारत सरकारने कडक पावले उचलावी आणि दहशतवादाचा समूळ नाश करावा, अशी मागणी लोणावळा शहर काँग्रेस कमिटी कडून यावेळी करण्यात आली.
तसेच अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत याकरिता प्रार्थना करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व लोणावळा शहर काँग्रेसचे प्रभारी निखिल कवीश्वर, माजी उपनगराध्यक्ष संध्या खंडेलवाल, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, काँग्रेस कार्ड कमिटी सदस्य सुबोध खंडेलवाल, कम्मुभाई जस्दनवाला, हाजी अब्बास शेख, मंगेश बालगुडे, योगेश गवळी, संजय तळेकर, अजय राऊत, सुर्यकांत औरंगे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार
