व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात वनविभागाकडून 36 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती ; उन्हाच्या काहिलीत वन्यजीवांना मिळणार पाणी । Maval News

मावळ तालुक्यातील नाणे मावळ भागात आतापर्यंत 9 पाणवठे तयार करण्यात आले आहेत. तर आंदर मावळ परिसरात 27 ठिकाणी पाणवठ्यांची सोय करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 24, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Forest Department creates 36 artificial water bodies in Maval taluka Wildlife will get water during summer

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात सर्वप्रथम जंगल परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. नैसर्गिक पाणवठे आटल्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशात वन्यजीव कधी कधी जंगल सोडून मानवी वस्तीत येतात, या सर्व पार्श्वभूमीवर जंगलातील वन्यजीवांना पाण्याचा तुटवडा जाणवू नये व पाण्यावाचून त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी मावळ तालुक्यात वनविभागाकडून कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

मावळ तालुक्यातील नाणे मावळ भागात आतापर्यंत 9 पाणवठे तयार करण्यात आले आहेत. तर आंदर मावळ परिसरात 27 ठिकाणी पाणवठ्यांची सोय करण्यात आली आहे. वनविभागाने केलेल्या एकूण 36 पाणवठ्यांमधून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार आहे.

  • शिरोता वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या उकसान वनपरिमंडळातील राकसवाडी येथील पाणवठ्यावर वन्यप्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले. यावेळी शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले, वनपरिमंडळ अधिकारी एम. बी. घुगे, जी. ए. भोसले, डी. डी. उबाळे, एस. बी. साबळे तसेच वनमजूर घुले उपस्थित होती. पाणवठ्यावर पाणी सोडण्याची ही प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.

‘वन्यजीव रक्षक मावळ’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश गराडे यांनी वनविभागाच्या प्रयत्नांचे स्वागत करताना सांगितले की, ‘वन्यप्राण्यांचे संवर्धन व त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची अत्यंत गरज आहे. हे कार्य स्थानिक नागरिकांसाठीही प्रेरणादायी आहे.’ वनविभागाच्या या उपक्रमामुळे जंगल परिसरात राहणाऱ्या वन्यजीवांना उन्हाळ्यात दिलासा मिळणार असून मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासही मदत होणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार


dainik maval jahirat

Previous Post

आंबी येथील कृषी महाविद्यालयात मधमाशी पालनाचे प्रशिक्षण सुरू । Talegaon Dabhade

Next Post

पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहर काँग्रेस कमिटीकडून जाहीर निषेध । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala City Congress Committee publicly condemns terrorist attack in Pahelgam

पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहर काँग्रेस कमिटीकडून जाहीर निषेध । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.