व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘तळेगावमधील लाडक्या बहिणींना नाट्यगृह हवंय, असं दादांना सांगा, म्हणजे लवकर निधी मिळेल’ – मकरंद अनासपुरे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 26, 2025
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
anniversary of Talegaon branch of Akhil Bharatiya Marathi Natya Parishad celebrated with enthusiasm

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगावकरांची नाट्यगृहाची मागणी पूर्ण होणे अवघड नाही. तळेगाव दाभाडेमधील लाडक्या बहिणींनाच नाट्यगृह हवं आहे, असे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना सांगा म्हणजे लवकर निधी मिळेल, अशी मिश्किल टिपणी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे तळेगाव दाभाडे शाखेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेते अनासपुरे बोलत होते.

  • यंदाचा कलागौरव पुरस्कार हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रसाद खांडेकर यांना, प्रसिद्ध सतार वादक विदुर महाजन यांना जीवन गौरव पुरस्काराने, तर प्रा. नितीन फाकटकर यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

यावेळी आमदार सुनील शेळके, प्रगतशील शेतकरी सुनील जाधव, नंदकुमार वाळंज, नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे, सचिव संजय वाडेकर, संचालक सुरेश दाभाडे, विलास काळोखे, तेजस धोत्रे, नंदकुमार वाळुंज, राजेश बारणे, संजय चव्हाण, सुनील जाधव, गणेश खांडगे, कृष्णा कारके, हरिश्चंद्र गडसिंग, दादासाहेब उऱ्हे, चंद्रकांत भिडे आदी उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके म्हणाले, की नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेची वीस वर्षाची वाटचाल वखाणण्याजोगी आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची कला नाट्य परिषदेने जपली आहे. तळेगाव दाभाडे शहरात नाट्यगृहासाठी आपण आग्रही असून, आपल्या कार्यकाळात नाट्यगृहाचे काम तडीस नेण्याचा संकल्प आहे. त्यासाठी येत्या जून-जुलैमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याचा शब्द दिल्याचेही आमदार शेळके यांनी सांगितले.

सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविकात सांगितले, की तळेगाव दाभाडे शहरात कलाकारांची खाण आहे. त्यामुळे लवकरात लवकर तळेगावकर रसिकांच्या सेवेत नाट्यगृह आणण्याचा प्रयत्न असून, राजकीय इच्छाशक्तीच यासाठी कामी येणार आहे. आमदार शेळके यांनी यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी, तर आभार नितीन शहा यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News


dainik maval jahirat

Previous Post

विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी ठोस निर्णय आवश्यक ; आमदार शेळके यांची डीपीडीसी बैठकीत आग्रही भूमिका

Next Post

मावळातील कमी पटसंख्येच्या शाळांबाबत तोडगा काढण्याची मागणी ; शिक्षकांचे आमदार सुनील शेळके यांना निवेदन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Action will be taken against illegally running children homes hostels and orphanages

मावळातील कमी पटसंख्येच्या शाळांबाबत तोडगा काढण्याची मागणी ; शिक्षकांचे आमदार सुनील शेळके यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.