Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज, सोमवारी (5 मे) जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results आणि results.digilocker.gov.in या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन निकाल पाहता येतील. तर, महाविद्यालयांना आवश्यक कॉलेज लॉग-इनसह mahahsscboard.in वर एकत्रित निकाल पाहता येतील. (How to Search Maharashtra Board Result)
- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचे निकाल जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध प्रवेश परीक्षांसह उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून, महाराष्ट्र राज्य मंडळाने नेहमीपेक्षा लवकर बारावीच्या परीक्षा सुरू केल्या होत्या. त्यामुळे या परीक्षेचा निकालही लवकर लावण्यात येत आहे.
निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
1. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
2. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा.
3. आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
4. यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2025 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
5. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
निकाल एसएमएसद्वारे पाहा
1. तुमच्या मोबाइलमध्ये एसएमएसचं अॅप घ्या.
2. यामध्ये महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी निकाल 2025 साठी MHSSC सीट क्रमांक टाइप करा .
3. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता बारावी निकाल 2025 साठी MHHSC सीट क्रमांक टाइप करा .
4. त्यानंतर 57766 वर एसएमएस पाठवा.
अधिक वाचा –
– वाळू, खडी, मुरुम, दगड आदी बांधकाम साहित्य वापरताना गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक । Pune News
– पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, ‘असा’ करा अर्ज । Pune News
– पवना धरणात अवघा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक ! 30 जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी, नागरिकांनी पाणी जपून वापरावे । Pavana Dam
– राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मावळ तालुक्यातील खेळाडूंना घवघवीत यश । Lonavala News