व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! शेत, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना मिळणार मोफत पोलीस बंदोबस्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांकरिता मोठा निर्णय घेतला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 6, 2025
in महाराष्ट्र
com maharashtra devendra fadanvis

Photo Courtesy : x / com maharashtra


Dainik Maval News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांकरिता मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे शेत आणि पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढताना तसेच सर्व प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोफत देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

जे शेतकरी अतिक्रमण काढताना आणि मोजणी करताना अडवणूक करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशा सूचनाही क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.

कोणतेही शुल्क आकारू नये –
महसूल, नियोजन आणि रो.ह.यो. विभागाच्या शासन निर्णयानुसार गृह विभागाने हे आदेश निर्गमित केले आहेत. कृषी मालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी सुरळीत पोलीस बंदोबस्त असावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासह पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणेने कोणतेही शुल्क आकारू नये आणि सदर रस्त्यांचे अतिक्रमणे काढताना आणि मोजणी करताना अडथळा निर्माण करणाऱ्यांवर तसेच शेती रस्ते बंद करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्यात.

हे निर्देश राज्यातील शेतीला आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत. या निर्णयामुळं मुळे पाणंद रस्ते विकास होण्याच्या मोहिमेला वेग येणार आहे.

पोलीस निरीक्षक घेणार निर्णय –
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणंद रस्त्यांच्या अंमलबजावणीबाबत गेल्या महिन्यांत दोन वेळा बैठका घेऊन अंमलबजावणीत स्पष्टता यावी, यासाठी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन त्यांनी मोफत पोलीस बंदोबस्त देण्याचा निर्णय करुन घेतला. त्यानुसार, आता तालुका पातळीवरचे पोलीस निरीक्षक हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पोलीस बंदोबस्त पुरविण्याचा निर्णय घेतील.

याबाबत बोलताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, शेतापर्यंत जोपर्यंत रस्ता, वीज आणि पाणी व महत्वाची शेतीपूरक वाहने जात नाहीत. तोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही. यासाठी पाणंद रस्त्याची विशेष मोहीम राज्यभर राबवित आहोत. त्याला चांगले यश येत असून शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्तासाठी थांबावे लागत होते. आर्थिक भार सहन करावा लागत होता. आता या दोन्ही अडचणी काढून टाकल्या आहेत. यामुळे योजनेला आणखी गती येईल.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती 


dainik maval jahirat

Previous Post

धक्कादायक ! पवन मावळातील शिळींब-चावसर रस्त्यालगत अज्ञात व्यक्तीचा पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Next Post

Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Operation Sindoor Updates

Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.