व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला आणि दहशतवादाला काय उत्तर देणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 7, 2025
in देश-विदेश
Operation Sindoor Updates

File Image


Dainik Maval News : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला आणि दहशतवादाला काय उत्तर देणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. त्यानंतर अखेर काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भारताने एका गुप्त मोहिमेच्या अंतर्गत एअर स्ट्राईक केला आहे. भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये नऊ ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. ( Operation Sindoor Updates )

संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केलं. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. रात्री 1 वाजून 44 वाजता हा स्ट्राईक करण्यात आला. ( india hits air strike terrorist bases in pakistan and pok after pahalgam terror attack kashmir )

या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक
1) बहावलपूर
2) मुरिदके
3) गुलपूर
4) भीमबर
5) चक अमरु
6) बाग
7) कोटली
8) सियालकोट
9) मुजफ्फराबाद

संरक्षण मंत्रालयानं म्हटले की, आमची कारवाई केंद्रीत, स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारताने ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्ध्वस्त करण्यात संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती.

संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार, आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईल. ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ, असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जलकरार स्थगित केला आहे. पाकिस्तानचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत. याशिवाय भारतानं पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी संख्या देखील कमी केली आहे. भारतीय सैन्य दलांनी केलेल्या कारवाईचं विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केलं आहे.

जय हिंद 🇮🇳

भारत माता की जय ! pic.twitter.com/vNgDhYw5Nk

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 6, 2025

अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती 


dainik maval jahirat

Previous Post

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! शेत, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना मिळणार मोफत पोलीस बंदोबस्त

Next Post

मधमाश्यांच्या हल्ल्यात माजी उपसरपंचाचा मृत्यू, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bees attack citizens who went for morning walk Death of former deputy sarpanch shocking incident in Maval

मधमाश्यांच्या हल्ल्यात माजी उपसरपंचाचा मृत्यू, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.