Dainik Maval News : मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे डोंगरावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (६ मे) सकाळी घडली.
- हनुमंत बबूशा कोयते (44) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हनुमंत कोयते हे नवलाख उंबरे गावचे माजी उपसरपंच होते. दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर (सर्व रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) अशी जखमींची नावे आहेत.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद कऱण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलाख उंबरे येथील डोंगरावर दररोज स्थानिक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जातात.
- मंगळवारी सकाळी हनुमंत कोयते, दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर हे चौघेजण मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. डोंगर चढत असताना डोंगरमधील तामकडा येथे अचानक चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हनुमंत कोयते यांचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले.
जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हनुमंत कोयते यांच्या निधनावर शोक व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्ती, आणि दोन मुले असा परिवार आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती