व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne

लोणावळ्यातील पावसाळापूर्व कामाला गती द्या ; खासदार श्रीरंग बारणे यांचे प्रशासनाला आदेश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 7, 2025
in ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Speed ​​up pre monsoon work in Lonavala MP Shrirang Barne orders administration

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरात सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाळ्यात पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे पावसाळ्यात नागरिक, पर्यटकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. पावसाळापूर्व कामाला गती द्यावी. नालेसफाई पूर्ण करावी. वाहनतळ विकसित करावे. भूशी डॅमकडे जाणा-या रस्त्याच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नगरपरिषदेच्या अधिका-यांना दिल्या.

  • खासदार बारणे म्हणाले, लोणावळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शहरात कोठेही पाणी साचून राहता कामा नये. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी करावी. पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटकांना कोणत्याही असुविधेला सामोरे जावे लागू नये. पर्यटकांसाठी वाहनतळाची व्यवस्था करावी. भूशी डॅमकडे जाणारा रस्त्याकडे सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. वाहनतळासाठी जागेचे भूसंपादन करावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणाच्या कामाला गती द्यावी. सद्यस्थिती ४० टक्के काम झाले आहे. तीन कोटी १४ लाख रुपयांचे हे काम आहे.
  • भाजीपाला मार्केटमध्ये मल्टीपर्पज वाहनतळ विकसित करावे. त्यासाठी नगरविकास विभागाकडून मदत केली जाईल. वल्हवन तलावाचे सुशोभीकरण करावे. खंडाळा येथील उद्यानाच्या कामाला गती द्यावी. पर्यटकांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी. त्यादृष्टीने वाहतुकीचे नियोजन करावे. पोल क्रमांक ३०, ३२ येथे रेल्वे दोन पूल उभारणार आहे. त्यासाठी तत्काळ जागेचे भूसंपादन करावे. दोन महिन्यात जागेचे भूसंपादन झाले पाहिजे.
  • लोणावळ्यातून वाहणारी इंद्रायणी नदी स्वच्छ करावी. नदीतील पाण्यावरील जलपर्णी बाहेर काढावी. पावसाळ्यापूर्वी सर्व नाले साफ करावेत. पावसाळ्यात कोठेही पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती १५ दिवसात लेखी स्वरुपात देण्याचे निर्देशही खासदार बारणे यांनी दिले.

लोणावळा शहरातील विविध विकास कामांबाबत खासदार बारणे यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. लोणावळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी अशोक साबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेना महिला संघटीका मनिषा भांगरे,आरपीआयचे पच्छिम महाराष्ट्र नेते सूर्यकांत वाघमारे ;

लोणावळा नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ताभाऊ केदारी, युवासेना तालुका प्रमुख विशाल हेलावळे, युवासेना उपतालुका प्रमुख नितीन देशमुख, भाजपा लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड, नाजीर शेख, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, शिवसेना उपशहर प्रमुख विशाल पठारे, माजी नगरसेविका सिंधुताई परदेशी, कल्पनाताई आखाडे, मनसे शहर प्रमुख निखिल भोसले, प्रकाश पठारे, मंगेश येवले, विजय आखाडे, सुनिल तावरे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती 


dainik maval jahirat

Previous Post

मधमाश्यांच्या हल्ल्यात माजी उपसरपंचाचा मृत्यू, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval News

Next Post

महाराष्ट्रात आज १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’ ; नागरिकांना नेमकं काय शिकवलं जाणार? जाणून घ्या । Security Mock Drill

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mock Security Drill to be organized at 16 places in Maharashtra today

महाराष्ट्रात आज १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’ ; नागरिकांना नेमकं काय शिकवलं जाणार? जाणून घ्या । Security Mock Drill

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.